हंगेरियन चाहते (Hungarian fans) वेम्बली स्टेडियमवर (Wembley Stadium) पोलिसांशी भिडले. Dainik Gomantak
क्रीडा

फुटबॉल वर्ल्डकपच्या क्वालिफायर सामन्यात चाहते अन् पोलिसांमध्ये वादावादी

वर्णद्वेषी घटनेसाठी एका प्रेक्षकाला (fans) अटक करण्याचा प्रयत्न केला त्यावरुन वाद हा सुरु झाला. पण पोलिसांनी (Police) हे प्रकरण योग्य रित्या हाताळल्याने पुढे कोणतीही घटना घडली नाही.

दैनिक गोमन्तक

इंग्लंड (England) विरुद्ध मंगळवारी झालेल्या वर्ल्डकप (World Cup) क्वालिफायर फुटबॉल (Football) सामन्या दरम्यान हंगेरियन चाहते (Hungarian fans) वेम्बली स्टेडियमवर (Wembley Stadium) पोलिसांशी भिडले. सामन्याच्या प्रारंभी चाहते आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली. मेट्रोपॉलिटन पोलिसांनी (Metropolitan Police) या घटनेबद्दल ट्विटरवर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.

ते म्हणाले, जेव्हा त्यांनी वर्णद्वेषी घटनेसाठी एका प्रेक्षकाला अटक करण्याचा प्रयत्न केला त्यावरुन वाद हा सुरु झाला. वेम्बली येथे सामना सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात, पोलीस अधिकारी वांशिक अपशब्द वापरणाऱ्या प्रेक्षकाला अटक करण्यासाठी स्टँडवर पोहोचले, तेव्हा इतर प्रेक्षकही या प्रकरणात सहभागी झाले त्यानंतर तेथे तणाव निर्माण झाला.

मेट्रोपॉलिटन पोलिसांनी एका निवेदनात म्हटले, वेम्बली येथे आज रात्री सामना सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात, अधिकारी कारभाऱ्यांबद्दल केलेल्या टिप्पण्यांमुळे काही प्रेक्षकांना अटक करण्यासाठी स्टँडवर पोहोचले, पोलीस अधिकाऱ्यांनी अटकेचा बडगा उगारल्यानंतर प्रेक्षकांनी लढा सुरू केला. पण पोलिसांनी हे प्रकरण योग्य रित्या हाताळल्याने पुढे कोणतीही घटना घडली नाही.

दरम्यान, फुटबॉल संघटनेने (एफए) याबाबत चौकशीचे आश्वासन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, आज रात्री वेम्बली स्टेडियमवर फिफा 2022 विश्वचषक पात्रता स्पर्धे दरम्यान घडलेल्या घटनेची आम्हाला माहिती आहे. आम्ही या घटनेची चौकशी करून FIFA ला अहवाल देऊ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT