India Football: संभाव्य फुटबॉल संघात गोव्याचे सहा जण

India Football: सेरिटन, मंदारचे पुनरागमन; आदिल, ग्लॅन, ब्रँडन, लिस्टन कायम
India Football Team Practice File Photo
India Football Team Practice File PhotoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : आगामी आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण (International Friendlies) फुटबॉल लढतीनिमित्त राष्ट्रीय प्रशिक्षक इगोर स्टिमॅक (Igor Stimac) यांनी संभाव्य भारतीय फुटबॉल संघ (India Football Team) जाहीर केला असून त्यात गोव्यातील (Goa) सहा जण आहेत. कोविड-19 बाधित ठरल्यामुळे जूनमधील फिफा विश्वकरंडक व आशिया करंडक पात्रता फेरीतील लढतीस मुकलेला बचावपटू सेरिटन फर्नांडिस, तसेच मंदार राव देसाई यांनी पुनरागमन केले आहे. आदिल खान, ग्लॅन मार्टिन्स, ब्रँडन फर्नांडिस व लिस्टन कुलासो हे संघातील अन्य गोमंतकीय आहेत. संभाव्य फुटबॉल संघाचे शिबिर कोलकाता येथे होईल. 15 ऑगस्ट रोजी संघ शिबिरासाठी एकत्र येईल आणि 16 ऑगस्टपासून सराव सत्रास सुरवात होईल, असे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने नमूद केले. सप्टेंबर महिन्यात भारतीय संघ आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामने खेळणार असून त्यानिमित्त तयारीवर भर राहील, असेही महासंघाने स्पष्ट केले आहे. एटीके मोहन बागान आणि बंगळूर एफसी मालदीवमध्ये होणाऱ्या एएफसी कप स्पर्धेत खेळणार आहेत, त्यामुळे शिबिरासाठी या दोन्ही संघातील खेळाडूंची निवड करण्यात आलेली नाही. ही स्पर्धा संपल्यानंतर या दोन्ही संघातील 13 खेळाडू राष्ट्रीय शिबिरात दाखल होतील. ``पुन्हा एकदा माझ्या खेळाडूंना भेटण्यास मिळत असल्याने मी खूप आनंदी आहे. एकत्रितपणे आगामी आव्हानासाठी तयारीवर भर राहील,`` असे स्टिमॅक यांनी नमूद केले.

India Football Team Practice File Photo
ISL Football League: गोव्याचा ग्लॅन मार्टिन्स प्रथमच राष्ट्रीय संभाव्य संघात

23 सदस्यीय संभाव्य संघ

गोलरक्षक : धीरज सिंग, विशाल कैथ, बचावपटू : आशिष राय, सेरिटन फर्नांडिस, आदिल खान, चिंग्लेन्साना सिंग, नरेंद्र गेहलोत, राहुल भेके, आकाश मिश्रा, मंदार राव देसाई, मध्यरक्षक : लालेन्गमाविया, ग्लॅन मार्टिन्स, जीक्सन सिंग, अनिरुद्ध थापा, ब्रँडन फर्नांडिस, सहल अब्दुल समद, हालिचरण नरझारी, बिपिन सिंग, महंमद यासीर, आघाडीपटू : राहुल केपी, फारुख चौधरी, ईशान पंडिता, रहीम अली. एएफसी कप स्पर्धेनंतर दाखल होणारे खेळाडू : गोलरक्षक : अमरिंदर सिंग, गुरप्रीतसिंग संधू, बचावपटू : प्रीतम कोटल, आशुतोष मेहता, संदेश झिंगन, सुभाशिष बोस, मध्यरक्षक : उदांता सिंग, प्रणॉय हल्दर, सुरेश वांगजाम, आशिक कुरूनियान, आघाडीपटू : लिस्टन कुलासो, मनवीर सिंग, सुनील छेत्री.

India Football Team Practice File Photo
Goa Football: सॅनसन परेरा एफसी गोवासाठी महत्त्वाचा खेळाडू

15 वर्षांनंतर कोलकात्यात

फुटबॉल महासंघाच्या माहितीनुसार, तब्बल 15 वर्षांनंतर कोलकात्यात भारताच्या सीनियर संघाचे शिबिर होत आहे. यापूर्वी 2006 मध्ये सौदी अरेबियाविरुद्धच्या फिफा विश्वकरंडक लढतीनिमित्त कोलकात्यात भारतीय संघाचे सराव शिबिर झाले होते. यावेळचे शिबिर कोरोना विषाणू महामारीमुळे जैवसुरक्षा वातावरणात असेल. खेळाडू व सपोर्ट स्टाफची नियमित चाचणी होईल.

India Football Team Practice File Photo
India Football: सर्वोत्तम रेफरी पुरस्काराने प्रेरणा : तेजस

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com