Stuart Broad Dainik Gomantak
क्रीडा

Stuart Broad retirement: ऍशेस कसोटी सुरु असतानाच ब्रॉड अचानक निवृत्त! 17 वर्षे गाजवले क्रिकेटचे मैदान

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

Pranali Kodre

Stuart Broad retire From International Cricket: इंग्लंडचा 37 वर्षीय वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने शनिवारी (29 जुलै) अचानक क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या ऍशेस 2023 मालिकेतील द ओव्हल मैदानावर सुरू असलेला पाचवा कसोटी सामना त्याचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना असणार आहे.

या ऍशेस कसोटी मालिकेतील शनिवारी तिसरा दिवस होता. पण याच दिवशी ब्रॉडने त्याच्या 17 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट करत असल्याचा आपला निर्णय जाहीर केला.

ब्रॉड इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज म्हणून गणला जातो. तो जेम्स अँडरसननंतर कसोटी क्रिकेटमध्ये 600 विकेट्स घेणारा इंग्लंडचा दुसराच गोलंदाज आहे. तसेच ऍशेल मालिकेत 150 पेक्षा अधिक विकेट्स घेणारा केवळ तिसरा गोलंदाज आहे.

ब्रॉड कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या जगातील एकूण गोलंदाजांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे, तर एकूण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये 845 विकेट्ससह सातव्या क्रमांकावर आहे.

ब्रॉडने निवृत्तीचा निर्णय घेताना सांगितले की 'हा खूप सुंदर प्रवास होता. इंग्लंडचा आणि नॉटिंगघमशायरचा बॅच घालणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. माझे क्रिकेटवर अजूनही खूप प्रेम आहे. ही खूपच चांगली मालिका आहे आणि मला नेहमीच असे वाटते की शिखरावर असताना शेवट व्हावा. आणि ही मालिका सर्वात आनंददायक आणि मनोरंजक आहे, ज्याचा मी भाग होतो.'

तसेच ब्रॉडने सांगितले की तो निवृत्तीबद्दल गेल्या काही महिन्यांपासून विचार करत होता, पण शुक्रवारी रात्री 8.30 वाजता निवृत्तीचा निर्णय घेतला. तसेच त्याने सांगितले की त्याला ऍशेसमध्येच अखेरीस फलंदाजी आणि गोलंदाजी करत कारकिर्द संपवायची होती.

याशिवाय ब्रॉडने सांगितले की त्याने शुक्रवारी रात्रीच कर्णधार बेन स्टोक्सला त्याच्या निर्णयाबद्दल सांगितले होते, तर संघाला शनिवारी सकाळी सांगितले.

साल 2006 मध्ये ब्रिस्टोल येथे पाकिस्तानविरुद्धच्या टी20 सामन्यातून ब्रॉडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने त्याच्या कारकिर्दीत 167 कसोटी सामने खेळले असून 602 विकेटस (29 जुलै 2023 पर्यंत) घेतल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावावर 1 शतक आणि 13 अर्धशतकांसह 3647 धावांचा समावेशही आहे.

त्याने 121 वनडे सामने खेळले असून यामध्ये त्याने 178 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 529 धावा केल्या आहेत. ब्रॉडने त्याच्या कारकिर्दीत 56 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 65 विकेट्स घेतल्या आहेत.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 21 वर्षांचा असताना ब्रॉड आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पहिला गोलंदाज बनला होता, ज्याच्या एका षटकात सलग 6 षटकार मारण्यात आले होते. साल 2007 टी20 वर्ल्डकपमध्ये भारताचा अष्टपैलू युवराज सिंगने ब्रॉडविरुद्ध सलग ६ षटकार मारले होते. पण त्यानंतर ब्रॉडने मागे वळून पाहिले नाही आणि तो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिग्गज गोलंदाज म्हणून नावाजला गेला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT