Ashes Series 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍशेस मालिकेतील शेवटचा कसोटी सामना ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने दुसऱ्या डावात केवळ एका षटकाराच्या मदतीने 18 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला.
ऍशेस मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा तो नंबर 1 फलंदाज ठरला आहे. या मालिकेत त्याने आतापर्यंत 15 षटकार मारले असून माजी कर्णधार केविन पीटरसनला मागे टाकले आहे.
दरम्यान, केविन पीटरसनने (Kevin Peterson) 2005 च्या ऍशेस मालिकेत एकूण 14 षटकार ठोकले होते. आता बेन स्टोक्सने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 18 वर्षानंतर 2023 मध्ये 15 षटकारांसह त्याला मागे टाकले आहे. 2005 मध्ये 11 षटकार मारणाऱ्या अँड्र्यू फ्लिंटॉपचे नावही या यादीत आहे.
15 – बेन स्टोक्स, 2023
14 – केविन पीटरसन, 2005
13 – बेन स्टोक्स, 2019
11 - अँड्र्यू फ्लिंटॉफ, 2005
दुसरीकडे, या ऍशेस मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दोन्ही डावात बेन स्टोक्सने एकही षटकार मारला नाही. तर दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात 9 षटकार मारले होते. त्यानंतर तिसऱ्या कसोटीत त्याने 5 षटकार ठोकले.
चौथ्या कसोटीत कर्णधार स्टोक्सने एकही षटकार मारला नाही. यानंतर त्याने पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात 1 षटकार लगावला. अशाप्रकारे त्याने या मालिकेत आतापर्यंत एकूण 15 षटकार ठोकले आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) पहिल्या डावात बेन स्टोक्सने 51 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात 42 धावा केल्या. सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या डावात 283 धावा केल्यानंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला 293 धावांवर रोखले. आता दुसऱ्या डावात इंग्लिश संघाने 5 विकेट गमावून 335 धावा केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.