Ashes 2023 मध्ये पुन्हा रनआऊटवरून राडा! स्मिथ क्रिजमध्ये येण्याआधी बेअरस्टोने बेल्स उडवले पण...

Steve Smith Run-Out: बेअरस्टोने केलेल्या रनआऊटच्या प्रयत्नात स्टिव्ह स्मिथला नाबाद देण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.
Steve Smith and Jonny Bairstow
Steve Smith and Jonny BairstowDainik Gomantak
Published on
Updated on

Steve Smith controversial run out decision by third umpire Nitin Menon:

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात सुरु असेलल्या ऍशेस 2023 मालिकेतील 5 वा सामना द ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघात चांगलीच चूरस पाहायला मिळत आहे. या मलिकेत काही वादही झालेले पाहायला मिळाले आहेत. तिसऱ्या कसोटीतील जॉनी बेअरस्टोच्या विकेटमुळे बराच वाद झाला होता. आता पुन्हा असाच एक वाद पाचव्या सामन्यातही झाला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 103.1 षटकात 295 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे त्यांनी 12 धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने 123 चेंडूत 71 धावांची खेळी केली.

मात्र स्मिथ 44 धावांवरच बाद झाला असता, पण तिसरे पंच नितीन मेनन यांनी दिलेल्या निर्णयामुळे त्याला जीवदान मिळाले. पण या निर्णयामुळे बराच वाद झालेला पाहायला मिळाला.

Steve Smith and Jonny Bairstow
Ashes 2023: स्टुअर्ट ब्रॉडने गाठला 600 विकेट्सचा टप्पा, मुरलीधरन-वॉर्नच्या खास क्लबमध्ये दणक्यात एन्ट्री!

झाले असे की डावाच्या 78 व्या षटकात स्टीव्ही स्मिथने लेग साईड शॉट मारला. त्यानंतर त्याने कर्णधार पॅट कमिन्सबरोबर दुहेरी धावा धावण्याचा प्रयत्न केला. पण दुसरी धाव घेत असताना बदली क्षेत्ररक्षक जॉर्ज एलहमने चेंडू थेट स्टंपवर फेकण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी चेंडूत यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोच्या हातात गेला. त्यानेही चपळाईने स्टंपवरून बेल्स उडवले. हे पाहून इंग्लंड संघाने सेलिब्रेशन केले, तसेच स्मिथलाही तो बाद असल्याचे वाटले होते आणि तोही परत जाण्याच्या तयारीत होता. पण बराच वेळ तिसरे पंच नितीन मेनन यांनी रिप्ले पाहिले.

रिप्लेच्या अनेक फ्रेम्स पाहिल्यानंतर त्यांनी स्मिथला नाबाद दिले कारण, तो क्रिजमध्ये पोहचेपर्यंत बेल्स स्टंपवरून पूर्ण हटलेल्या नव्हत्या. तो क्रिजमध्ये पोहचल्यानंतर बेल्स स्टंपपासून पूर्ण वेगळे झाले. या निर्णयामुळे सगळेच चकीत झाले.

दरम्यान, नियम 29.1 नुसार 'जोपर्यंत कमीतकमी एक बेल स्टंपवरून पूर्णपणे वेगळी होते किंवा एक किंवा त्यापेक्षा अधिक स्टंप जमीनीतून उखडले जातील, त्याचवेळी विकेट गेल्याचे मानले जाते.'

Steve Smith and Jonny Bairstow
Ashes Series 2023: स्टुअर्ट ब्रॉडने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला इंग्लिश क्रिकेटर!

याच नियमामुळे स्मिथला नाबाद देण्यात आले. दरम्यान नितीन मेनन यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल अनेकांनी कौतुकही केले आहे. यात भारताचा फिरकीपटू आर अश्विनचाही समावेश आहे.

स्मिथने नंतर या जीवदानाचा फायदाही उचलला आणि ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात सर्वोच्च खेळी केली. त्याच्याशिवाय ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने 47 धावांची खेळी केली. तसेच तळात पॅट कमिन्सने 36 धावांचे आणि टॉड मर्फीने 34 धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला आघाडी घेण्यात यश मिळाले. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी इंग्लंडने पहिल्या डावात 54.4 षटकरात सर्वबाद 283 धावा केल्या होत्या. इंग्लंजकडून हॅरी ब्रुकने सर्वाधिक 85 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com