James Anderson Dainik Gomantak
क्रीडा

Ashes 2023: 'भारताविरुद्धच्या सीरीजपर्यंत...', निवृत्तीबाबत अँडरसन स्पष्टच बोलला

Ashes 2023: ओव्हलवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍशेस मालिकेतील पाचवा कसोटी सामना खेळला जात आहे.

Manish Jadhav

ENG vs AUS Ashes 2023: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. त्याचवेळी, ओव्हलवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍशेस मालिकेतील पाचवा कसोटी सामना खेळला जात आहे.

या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आला. जो पावसामुळे ड्रॉ राहिला. या सामन्यानंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) निवृत्ती घेऊ शकतो, अशी बातमी आली होती.

अशा परिस्थितीत आता त्यानेच त्याच्या निवृत्तीच्या बातम्यांवर मोठे वक्तव्य केले आहे.

जेम्स अँडरसन ऍशेसनंतर निवृत्त होणार?

इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन म्हणाला की, 'पाचव्या ऍशेस कसोटीनंतर क्रिकेटला अलविदा म्हणू इच्छित नाही कारण मी सध्या आपल्या संघाला खूप काही देऊ शकतो.'

इंग्लंडसाठी (England) सर्वाधिक विकेट घेणारा अँडरसन रविवारी 41 वर्षांचा होणार आहे. या ऍशेस मालिकेत त्याने केवळ पाच विकेट्स घेतल्या आहेत, पण त्याने वाईट गोलंदाजी केली नाही, असा त्याचा विश्वास आहे.

त्याने बीबीसीशी बोलताना सांगितले की, 'मी वाईट गोलंदाजी केली किंवा माझा वेग कमी झाला असे मला वाटत नाही. मला वाटते की मी अजूनही संघाला खूप काही देऊ शकतो.'

तो पुढे म्हणाला की, ''जिथं निवृत्तीचा प्रश्न आहे, मी ती लवकर घेणार नाही. मी अजून खूप काही देऊ शकतो. तुम्ही प्रार्थना करा की मोठ्या मालिकेत वाईट टप्पा येऊ नये, पण माझ्यासोबत हे घडत आहे.

मला संघासाठी काहीतरी करण्याची आणखी एक संधी आहे. मी आज चांगली गोलंदाजी केली आणि उद्या काही विकेट घेऊ शकेन.''

भारत दौऱ्यादरम्यान...

दुसरीकडे, ऍशेस मालिकेनंतर इंग्लंडला जानेवारीत भारतात खेळायचे आहे आणि तोपर्यंत अँडरसन खेळेल अशी आशा आहे.

तो शेवटी म्हणाला की, 'जेव्हा गोलंदाज वयाची 30 ओलांडतो, तेव्हा लोक विचारु लागतात तो आणखी किती दिवस खेळणार आहे. पण गेल्या तीन-चार वर्षांत मी चांगली गोलंदाजी केली आहे. मी तंदुरुस्त असून चांगली कामगिरी करत आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Investment Fraud: 20.83 कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्याला नवे वळण; सुनावणीला गैरहजर राहिल्याने सुनीता रॉड्रिग्जविरुद्ध अटक वॉरंट

Babar Azam Captaincy: 'कॅप्टन्सी सोड अन्...!', वसीम अकरमने बाबर आझमची काढली खरडपट्टी; इंग्लंडविरुद्धचा पराभव पाकिस्तानच्या जिव्हारी

Goa Politics: 'गोवा फर्स्ट'चा नारा पुन्हा बुलंद! धर्मनिरपेक्ष आघाडीसाठी समविचारी पक्षांना एकत्र आणणार; गोवा फॉरवर्डची भूमिका स्पष्ट

खरी कुजबुज: कुडतरीत भाजपची शरणागती?

Goa Drug Case: ड्रग्स प्रकरणात गोव्याचा 'बाबा' आणि 'मुन्ना' चर्चेत; हैदराबादेत अटक केलेल्या तस्कराच्या चौकशीत आंतरराज्य नेटवर्कचा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT