या व्हिडिओने सर्वांच्या तोंडाला कुलूप लावले आहे. विराट-रोहितचे नाते कसे आहे.
या व्हिडिओने सर्वांच्या तोंडाला कुलूप लावले आहे. विराट-रोहितचे नाते कसे आहे. Dainik Gomantak
क्रीडा

ENG vs IND: विराट,रोहित यांच्यात वाद आहेत, असे बोलणाऱ्यांनी एकदा हा व्हिडिओ पहाच...

दैनिक गोमन्तक

टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने 151 धावांनी सामना जिंकला. यासह विराटच्या सैन्याने 5 कसोटींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात मोहम्मद सिराज, केएल राहुल, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी अप्रतिम कामगिरी केली. केएल राहुलला त्याच्या दमदार शतकासाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

दरम्यान, विराट कोहली आणि रोहित शर्माचा यांचा व्हिडिओ (Video by Virat Kohli and Rohit Sharma) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विजयानंतर दोन्ही खेळाडू एकमेकांना मिठी मारताना आणि सेलिब्रेशनमध्ये मग्न झालेले दिसत आहेत. दोन्ही खेळाडूंचे चाहते अनेकदा सोशल मीडियावर या दोघांमध्ये भांडणे (Arguing between the two) आहेत असे लिहित असतात. पण या व्हिडिओने सर्वांच्या तोंडाला कुलूप लावले आहे. विराट-रोहितचे नाते कसे आहे. यासाठी तुम्ही हा व्हिडीओ एकदा पहाच...

या कसोटी सामन्यात रोहित शर्मा उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला. त्याने पहिल्या डावात 145 चेंडूत कडक 83 धावा केल्या. केएल राहुलसोबत त्याने शतकी भागीदारी केली. विराट कोहलीच्या बॅटमधून या मालिकेत आतापर्यंत विशेष धावा निघाल्या तरी येणाऱ्या सामन्यांमध्ये त्याच्याकडून मोठ्या खेळीची प्रतीक्षा आहे. मात्र, त्याने दोन्ही सामन्यांमध्ये कर्णधार पद उत्तम रित्या संभाळले आहे. ज्या प्रकारे त्याने आपल्या वेगवान गोलंदाजांवर विश्वास ठेवला, ते अप्रतिम आहे. अश्विनला संघात न घेतल्यामुळे त्याच्यावर बरीच टीकाही झाली. पण टीम इंडियाच्या विजयाने सर्व टीकाकारांचे तोंड बंद केले आहे. आता टीम इंडिया 25 ऑगस्टला तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा सामना करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Due To Fasting: निर्जळी उपवास बेतला जीवावर, फोंड्यात बिहारच्या युवतीचा मृत्यू

Savoi Verem : निशानने धाग्यातून टिपला ‘द ग्लो ऑफ आई लईराई’;सावईवेरेतील युवा कलाकाराची कलाकृती

Goa Today's Live News: मिरामार येथे अंगावर वीज पडून केरळच्या एकाचा मृत्यू

Digilocker Result : ‘डिजिलॉकर’वर निकाल देणारे गोवा दुसरे राज्य

France Violence: फ्रान्समध्ये हिंसाचाराचा भडका! न्यू कॅलेडोनियात आणीबाणी लागू; 4 जणांचा मृत्यू, 5,000 दंगलखोरांवर कारवाई

SCROLL FOR NEXT