(Eng Vs Ind) इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाने इंग्लंड संघावर अतिशय रोमहर्षक पद्धतीने विजय मिळवला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी खूप काही गोष्टी पाहायला मिळाल्या. ज्यामध्ये भारताची दुसऱ्या डावातील गडगडलेली फलंदाजी, सामन्याचे पारडे इंग्लंडकडे झुकलेले, आणि त्यानंतर 9 व्या गड्यासाठी मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह यांनी रचलेली भागीदारी आणि शेवटी भारतीय गोलंदाजांनी इंग्लंड फलंदाजांवर वर्चस्व मिळवून खेचून आणलेली विजयश्री.
दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाल्यापासून इंग्लंड व भारत या दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. ज्यामध्ये इंग्लंडचा कर्णधार जोर रूटने नाणेफेक जिंकून भारताला दिलेली फलंदाजी,ज्यामध्ये रोहित (८३ धावा) व राहुल (१२९ धावा) यांनी केलेली उपयुक्त खेळी. जेम्स अँडरसनने मिळवलेले ५ गडी. मग इंग्लंडने भारताला दिलेले सडेतोड प्रत्युत्तर ज्यामध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूटने केलेली कप्तानी खेळी (१८० नाबाद) ही विशेष होती. व भारताच्या मोहम्मद सिराजच्या टिपलेले ४ गडी.
भारताच्या दुसऱ्या डावामध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमाल करून भारताच्या नाकी नऊ आणले. भारताची सलामी जोडी अपयशी ठरल्यानंतर मधल्या फळीने सावरण्यासाठी केलेली धडपड ज्यामध्ये चेतेश्वर पुजाऱ्याच्या २०६ चेंडूतील ४५ धावा रहाणेच्या समयोचित ६१ धावा या व्यतिरिक्त एकही भारतीय फलंदाज भारताचा डाव सावरू शकले नाही, परंतु आठव्या क्रमांकावर आलेला फलंदाज मोहंम्मद शमी व नवव्या क्रमांकावर आलेला जसप्रीत बुमराह यांनी रचलेली ८९ धावांची भागीदारी ही इंग्लंडला विजयापासून दूर नेण्यात फार उपयुक्त ठरली.
त्यानंतर इंग्लंडला २७१ धावांचे आव्हान देऊन भारतीय गोलंदाजांनी केलेली धुव्वादार गोलंदाजी. ज्या भारताच्या गोलंदाजीने इंग्लंडच्या चिंधड्या उडवल्या. भारताच्या या गोलंदाजीच्या वादळापुढे इंग्लंडचा कोणताच फलंदाज तग धरू शकला नाही. व इंग्लंडचा दुसरा डाव भारतीय गोलंदाजांनी १२० धावांत संपवून टाकला. व १५१ धावांनी क्रिकेटकची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारताने विजयश्री खेचून आणली. सामन्याचा मानकरी ठरला तो म्हणजे भारताचा शतकवीर के एल राहुल.
(संक्षिप्त धावफलक भारत प डाव. ३६४ धावा, इंग्लंड प डाव ३९१ धावा, भारत दु डाव २९८/८ घोषित, इंग्लंड दु डाव सर्वबाद १२० धावा. भारत विजयी)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.