James Anderson Vs Jaspreet Bumrah Apology case (Eng Vs Ind) Dainik Gomantak
क्रीडा

Eng Vs Ind: बुमराह आणि अँडरसन यांच्यातील माफी प्रकरण विनाकारण चिघळले

बुमराहने जाऊन अँडरसनची माफी मागितली, पण अँडरसनने बुमराहला नजरअंदाज केले (Eng Vs Ind)

Dainik Gomantak

भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर (Fielding Coach R. Shridhar) यांच्या सांगण्यानुसार दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (England Fast Bowler James Anderson) भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Indian Fast Bowler Jaspreet Bumrah) माफी नकारल्यानंतर दोन्ही संघांमधील वाद वाढला होता. आर. श्रीधर म्हणाले, "बुमराह एक प्रतिस्पर्धी वेगवान गोलंदाज आहे, पण तो जाणूनबुजून कोणालाही दुखावू इच्छित नाही," आर. अश्विनच्या (R. Ashwin) यूट्यूब चॅनेलवर चॅट शो दरम्यान श्रीधर इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात बुमराह आणि अंडरसन मध्ये घडलेल्या प्रसंगाविषयी ते बोलत होते. (Eng Vs Ind)

श्रीधर पुढे म्हणाले, "बुमराहने 8 ते 10 चेंडू टाकले. ज्यामध्ये यॉर्कर्स, बाऊंसर्सचा समावेश होता व त्यामुळे बुमराहची गोलंदाजी खेळून काढणे अँडरसनला कठीण जात होते. अगोदर वेगवान गोलंदाजांच्या क्लबमध्ये एक अलिखित नियम होता. गोलंदाजाने विनाकारण बाउन्सर न टाकता नियमबद्ध गोलंदाजी करून गडी बाद करा. तो अलिखित नियम सध्याच्या क्रिकेटमध्ये नावापुरता राहिलेला आहे. आता तो संपल्यात जमा आहे. श्रीधर पुढे म्हणाले की, तिसऱ्या दिवसाच्या खेळ समाप्तीनानंतर बुमराह अँडरसनजवळ जाऊन त्याची माफी मागितली, पण अँडरसनने त्याला बाजूला केले.

श्रीधर पुढे म्हणाले, यामुळे भारतीय संघाला राग आला आणि त्याचा परिणाम 5 व्या दिवशी दिसून आला बुमराह (नाबाद 34) आणि मोहम्मद शमी (नाबाद 56) यांच्यातील नवव्या विकेटसाठी 89 धावांच्या नाबाद भागीदारीनंतर भारताने लॉर्ड्सवरील दुसरा कसोटी सामना 151 धावांनी जिंकली. भारताने इंग्लंडला दोन सत्रात 120 धावांवर गुंडाळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Australia: मुसळधार पाऊस, विजेचा कडकडाट... वीज पडून एका खेळाडूचा मृत्यू, 'या' कारणामुळं भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया सामना रद्द

Fish Price Hike: मासे खाणं महागलं... सुरमई, पापलेट, कोळंबीची किंमत पाहून पळेल तोंडचं पाणी

Snake Attack Video: साप पकडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद! सापाने अचानक केला हल्ला, नंतर काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहा

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

SCROLL FOR NEXT