तिसऱ्या कसोटीचा सामनावीर ओली रॉबिन्सन संघ सहकार्यनसोबत मैदानात आनंद साजरा करताना (Eng Vs Ind) Tweeter / @ICC
क्रीडा

Eng Vs Ind: तिसऱ्या कसोटीत भारताचा दारुण पराभव

ओली रॉबिन्सन सामनावीर (MOM Ollie Robinson), मालिकेत इंग्लंड ची 1 - 1 ने बरोबरी (Eng Vs Ind)

Siddhesh Shirsat

Eng Vs Ind:

कसोटीच्या पाहिल्याच दिवशी भारत परावभाच्या छायेत

तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशीचा भारतीय संघाची कोलमडलेली फलंदाजी पाहता भारतीय संघ पराभवाच्या सावटाखाली गेला होता, कारण भरती संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली होती. आणि भारतीय संघाचा फलंदाजी करण्याचा निर्णय अंगाशी आला. कारण रोहित शर्मा (19 धावा) व अजिंक्य राहणे (18 धावा) या दोन फलंदाजाव्यतिरिक्त एकही भारतीय फलंदाजाला दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नाही. व भारतीय संघ कसोटीच्या पहिल्याच दिवशी 40 षटकांमध्ये केवळ 78 धावांत गारद झाला. इंग्लंडतर्फे अँडरसन व क्रेग ओव्हरटन या दोघांनी प्रत्येकी 3 बळी, तर रॉबिन्सन व करन या दोघांनी प्रत्येकी 2 बळी टिपून संपूर्ण भारतीय संघाला तंबूत धाडले.

त्यानंतर मैदानात फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंड संघाने खेळाच्या पहिल्याच दिवशी आपले मजबूत इरादे स्पष्ट केले. व 100 धावांची सलामी दिली, व भारताला अजून पराभवाच्या खाईत ढकलले.

कर्णधार जो रूटचे शतक आणि बरचं काही...

दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यानंतर इंग्लन्ड संघाने दोन गाडी गमावले. ज्यामध्ये रॉरी बर्न्स 61 धावा व हसीब हमीद 68 धावा, या सलामीवीरांनी इंग्लंडला मजबूत अशी सुरवात करून दिली. त्यानंतर आलेल्या डेव्हिड मलान 70 धावा व कर्णधार जो रूट 121 धावा (Joe Root Century) यांनी भारतीय गोलंदाजांचे कंबरडे मोडले. जो रुटने 165 चेंडू खेळून काढत 73 च्या सरासरीने 121 धावा कुटल्या. त्यानंतर जॉनी बेअरस्टो 29 धावा व क्रेग ओव्हरटन 32 धावा यांनी विशेष योगदान दिले. व खेळाच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्राच्या सुरवातीच्या काही षटकांत इंग्लंड संघाचा डाव 432 धावांत आटोपला. भारतातर्फे मोहम्मद शमी 4 बळी व बुमराह, सिराज, जडेजा यांनी प्रत्येकी 2 बळी टिपले.

भारतीय संघाच्या फलंदाजांनी दुसरा डाव सावरला पण...

कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजी समोर टिच्चून फलंदाजी केली. कारण भारतासमोर इंग्लंडचे पहिल्या डावात चे 354धावांची मोठी आघाडी होती. भारताकडून के एल राहुल 8 धावांवर स्वस्तात बाद झाल्या नंतर रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा यांनी भारतीय संघाला बऱ्यापैकी सावरण्याचा प्रयत्न केला परंतु रोहित शर्मा 59 धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेला भारतीय कर्णधार विराट कोहली व चेतेश्वर पुजारा यांनी उपयुक्त फलंदाजी केली पण...

खेळाचा चौथा दिवस सुरु झाल्यानंतर भारतीय संघाला अवकळा लागली व भारतीय संघ दुसऱ्या डावात 278 धावांत गारद झाला. इंग्लंड तर्फे ओली रोबिन्सन ५ बळी, क्रॅक ओव्हरटन ३ बळी तर जेम्स अँडरसन व मोइन अली यांनी प्रत्येकी १ बळी टिपला, भारतीय संघ इंग्लंडचे 354 धावांची आघाडी सुद्धा ओलांडू शकला नाही, त्यामुळे एक डाव आणि 78 धावांनी भारतीय संघ पराभूत झाला. (England Win 3rd Test) (India lost 3rd test)

(संक्षिप्त धावफलक: भारत प डाव 78 धावा इंग्लंड प डाव 432 धावा भारत दु डाव 278 धावा, भारत पराभूत 1 डाव व 78 धावा)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT