धोनीचा सहकारी आता 'या' संघाचा असेल कप्तान; यूएईमध्ये घेणार जबाबदारी

मात्र तो (Faf du Plessis) इंग्लंडच्या द हंड्रेड लीगमध्येही खेळू शकला नव्हता. अखेर त्याला त्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती.
Faf du Plessis
Faf du PlessisDainik Gomantak
Published on
Updated on

आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा अद्याप सुरु झालेला नाही. त्याआधी आयपीएलमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आता धोनीचा चेन्नई सुपर किंग्जमधील सहकारी फाफ डु प्लेसिसकडे (Faf du Plessis) पाहा. अबू धाबी टी 10 लीगमध्ये डु प्लेसिसला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तो येथे बांगला टायगर्स संघाचे (Bangla Tigers team) नेतृत्व करणार आहे. टी -ट्वेन्टी लीगचे आयोजन टी-ट्वेन्टी विश्वचषकानंतर करण्यात येणार आहे. ड्यु प्लेसिस सध्या दुखापतीतून सावरत आहे. यानंतर तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) खेळताना दिसेल. मात्र तो इंग्लंडच्या द हंड्रेड लीगमध्येही खेळू शकला नव्हता. अखेर त्याला त्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती.

Faf du Plessis
क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या 'स्पॉट फिक्सिंगला' 10 वर्षे पूर्ण

दरम्यान, अबू धाबी टी 10 लीग सुरु होण्यास अजून वेळ आहे. त्यामुळे तेथे डु प्लेसिस खेळण्याची शक्यता आहे. बांगला टायगर्सचा कर्णधार बनल्याबद्दल डु प्लेसिस आनंदी आहे. त्याने द नॅशनल न्यूजला सांगितले, “मला या नवीन फॉरमॅटचा भाग बनून आनंद झाला आहे. मी बांगला टायगर्सच्या कर्णधारपदासाठीही उत्सुक आहे. ” 37 वर्षीय ड्यूप्लेसिस पुढे म्हणाला की, टी 10 च्या लोकप्रियतेमुळे मी स्तब्ध आहे. या फॉरमॅटने ज्या प्रकारे हेडलाईन्स बनल्या आहेत ते पाहून कौतुकास्पद वाटत आहे. मी टी 10 मध्ये मोठ्या नावांसह खेळण्यास उत्सुक आहे. ” बांगला टायगर्सचे मालक मोहम्मद यासीन चौधरी (Mohammad Yasin Chaudhary) देखील फाफ डू प्लेसिसच्या सहभागामुळे खूप आनंदी आहेत.

Faf du Plessis
क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात 'स्लो' गतीने टाकलेला चेंडू माहीतीयं का?

डुप्लेसिसला आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातही चांगले खेळण्याची अपेक्षा

भारतात खेळल्या गेलेल्या IPL 2021 च्या पहिल्या टप्प्यात फाफ डु प्लेसिस उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. कोरोनामुळे आयपीएल पुढे ढकलल्यानंतर, तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळायला गेला, मात्र दुखापत झाल्याने त्याने स्पर्धेमधून माघार घ्यावी लागली होती. डु प्लेसिस अद्याप त्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. पण, अशी अपेक्षा आहे की, जेव्हा तो आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळायला उतरेल, तेव्हा तो आपल्या खेळाची सुरुवात भारतातून करेल. आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा देखील यूएईमध्ये आयोजित केला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com