भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील मँचेस्टर कसोटी (Test) रद्द केली गेली ज्यामुळे IPL मध्ये कोणताही अडथळा येऊ नये.
भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील मँचेस्टर कसोटी (Test) रद्द केली गेली ज्यामुळे IPL मध्ये कोणताही अडथळा येऊ नये. Dainik Gomantak
क्रीडा

ENG vs IND: पैसा आणि IPLसाठी पाचवा कसोटी सामना रद्द, मायकेल वॉनचा गंभीर आरोप

दैनिक गोमन्तक

ENG vs IND: इंग्लंडचा (England) माजी कर्णधार मायकेल वॉन (Michael Vaughan) याने पुन्हा एकदा अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. आयपीएल (IPL) आणि पैशामुळे मँचेस्टर कसोटी रद्द करण्यात आली असल्याचा आरोप मायकेल वॉन यांनी केला आहे. खेळाडूंना कोरोना पासून वाचविण्यासाठी भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील मँचेस्टर कसोटी (Test) रद्द केली गेली ज्यामुळे IPL मध्ये कोणताही अडथळा येऊ नये.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी आणि शेवटची कसोटी शुक्रवारी भारतीय संघाचा सहाय्यक फिजिओला कोरोनाची लागण झाल्याने शुक्रवारी रद्द करण्यात आली.

पैसे आणि आयपीएलसाठी सामना केला रद्द

याबाबत बोलताना वॉनने एका माध्यमात लिहिले, "खरे सांगायचे तर, हे सर्व पैशासाठी आणि आयपीएलसाठी करण्यात आले आहे. कसोटी रद्द करण्यात आली आहे कारण खेळाडूंना कोविड -19 पासून वाचवता यावे, आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोणताही अडथळा येऊ नाये. एका आठवड्यात आम्ही आयपीएल (IPL) बघू आणि तिथे खेळाडू हसत व आनंदी असतील. त्यांनी पीसीआर चाचणीवर भरोसा ठेवायला हवा होता. आता आपल्याला या विषाणूबद्दल बरेच काही माहित आहे. त्याला कसे रोखायचे आणि कसे हाताळायचे हे आपल्याला माहित आहे. खेळाडूंना दुहेरी लसीकरण करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या जैव सुरक्षेत देखील वाढ करता आली असती.

वॉन म्हणाले की, इंग्लंड विरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात भारत आपल्या 11 खेळाडूंना जमवू शकला नाही. यावर विश्वास ठेवणे त्याच्यासाठी कठीण आहे. क्रिकेटला या कसोटी सामन्याची गरज होती. मालिका अप्रतिम चालली होती. नाणेफेक होण्याआधी 90 मिनिटे कसोटी सामना रद्द केला जाऊ शकतो यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. हा प्रेक्षकांचा पूर्णपणे अनादर आहे.

सामना होण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले: ईसीबी

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे (ECB) मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन म्हणाले की, इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाचवी कसोटी रद्द झाल्याचे पाहून निराशा झाली. हा निकाल टाळण्यासाठी बोर्डाने सर्वतोपरी प्रयत्न केले. ईसीबीचे सीईओ हॅरिसन यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "गेल्या 24 तासांमध्ये अनेक गोष्टी घडल्या आहेत. एक क्रिकेट प्रेमी म्हणून, मला हे सांगायचे आहे की हा कसोटी सामना रद्द केल्यामुळे झालेल्या सर्व गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर व्यक्त करतो." हा सामना आयोजित करण्यात सक्षम न झाल्यामुळे मी खूप निराश आहे.

“मी अशा लोकांच्या अनेक व्यथा ऐकल्या आहेत ज्यांनी महिन्यांपासून बचत करुन या साथीच्या काळात मित्र आणि कुटुंबासह एक विशेष दिवस घालवण्याची योजना आखली होती. पण त्यांची निराशा झाली याबद्दल आम्ही त्यांची माफी मागतो. सामना होण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करीत होतो, यात काही उपाय काढता येईल का, यासाठी रात्रभर त्यावर काम करत होतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ईसीबीला (ECB) रद्द केलेल्या 5 व्या कसोटी सामना पुन्हा शेडूल्ड करण्याची ऑफर दिली आहे. बीसीसीआय आणि ईसीबीने शुक्रवारपासून मँचेस्टरमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याचा मार्ग काढण्यसाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या, मात्र भारतीय संघातील कोविड -19 प्रकरणामुळे सामना रद्द करावा लागला.

इंग्लंड खेळाडूंनी घेतला सूड

दरम्यान, पाचवा सामना रद्द झाल्यामुळे आता त्याचा इफेक्ट IPL वर देखील होण्याची शक्यता आहे. कारण आता इंग्लंडच्या खेळाडूंनी याचा सूड घेत IPL मधून माघार घेतली आहे. इंग्लंडचे खेळाडू जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow), डेव्हिड मलान (Dawid Malan) आणि ख्रिस वोक्स (Chris Vokes) आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्यामुळे IPL मधील सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांना धक्का बसला आहे. हैदराबादचा स्फोटक सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि पंजाब किंग्सचा धडाकेबाज फलंदाज दाऊद मालन हे दोघेही आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात आपापल्या संघाचा भाग राहणार नाहीत. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू ख्रिस वोक्सनेही आयपीएलमधून आपले नाव मागे घेतले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: गोव्यात सकाळी नऊपर्यंत 13.02 टक्के मतदान

Lok Sabha Election 2024: ''लोकसभा निवडणुकीनंतर ओबीसींच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावणार''; CM सावंत यांची ग्वाही

Lok Sabha Election 2024: तिसवाडीत एक लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क; खिस्ती मते ठरणार निर्णायक

Congress Leader Shashi Tharoor: ‘व्‍यक्तिस्‍वातंत्र्य’ अबाधित राहावे; शशी थरूर यांनी लेखक, विचारवंतांशी मडगावात साधला संवाद

Lok Sabha Election 2024: दक्षिण गोव्यात आज विक्रमी मतदानाची शक्यता; विरियातो अन् पल्लवी यांच्यात निकराची लढाई

SCROLL FOR NEXT