IND vs ENG: BCCI आणि ECB यांच्यातील वादानंतर सामना रद्द!

काही भारतीय खेळाडूंना (Indian players) मैदानात उतरण्याची इच्छा नव्हती या कारणास्तव इसीबीने 5वी कसोटी रद्द करण्याची घोषणा केली आहे.
Indian players
Indian playersDainik Gomantak
Published on
Updated on

भारत आणि इंग्लंड (INDvsENG) मध्ये चालू असलेल्या कसोटीचा (Test Match) पाचवा सामना आज होणार होता, मात्र आजचा हा सामना रद्द करण्यात आला आहे. शुक्रवारपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जाणारा भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. मालिकेतील कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. चौथ्या कसोटी सामन्यापर्यंत टीम इंडिया मालिकेत 2-1 अशी आघाडीवर होती.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की, भारताने सामना खेळण्यास असमर्थता व्यक्त केली आहे, यामुळे भारताला पराभूत मानले जाईल. दरम्यान BCCI आणि ECB यांच्यात जोरदार वादंगानंतर हा सामना रद्द करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर दोन्ही बोर्डांचे उच्च अधिकारी एकमेकांच्या संपर्कात होते. इनसाईडस्पोर्टसच्या अहवालानुसार, काही भारतीय खेळाडूंना मैदानात उतरण्याची इच्छा नव्हती या कारणास्तव इसीबीने 5वी कसोटी रद्द करण्याची घोषणा केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा (Rohit Sharma), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि इतर खेळाडू त्यांच्या कुटुंबियांसह प्रवास करत आहेत. या खेळाडूंनी कसोटी खेळण्यास नकार दिला होता. यानंतर ईसीबीने कसोटी सामना रद्द झाल्याची पुष्टी केली.

Indian players
ENG vs IND: पाचवी कसोटी रद्द झाल्यानंतर माजी खेळाडूंच्या संतप्त प्रतिक्रिया

शिवाय, ईसीबीने म्हटले आहे की, "भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी सुरू असलेल्या वाटाघाटींच्या आधारे, मँचेस्टरमधील कसोटी सामना रद्द करण्यात आला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे भारतीय खेळाडूंमध्ये घबराटीचे वातावरण असल्यामुळे भारताकडे कसोटी सामना खेळण्यासाठी प्लेइंग 11 नसल्यामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने सामना रद्द केल्याबद्दल क्रिकेट चाहत्यांची माफी मागितली आहे. मंडळाने म्हटले, “आम्ही क्रिकेट चाहत्यांची, न्यूज पार्टनर्स यांची माफी मागतो. क्रिकेट चाहत्यांची आमच्यामुळे गैरसोय झाल्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. लवकरच आम्ही या संदर्भात अधिक माहिती देणार आहोत. ”

दोन बोर्डांमधील संबंध ताणलेले का आहेत?

ईसीबी बीसीसीआयवर नाराज आहे. पहिल्यांदा गुरुवारी आपत्कालीन बैठकीदरम्यान, बीसीसीआयने ईसीबीला आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरक्षेसाठी कसोटी सामना रद्द करण्याचा सल्ला दिला. द्विपक्षीय बांधिलकीपेक्षा आयपीएलला प्राधान्य दिल्याबद्दल ईसीबी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. आणि आज भारतीय खेळाडूंनी मैदानवर येण्यास नकार दिल्याने सामना रद्द करावा लागला असल्याचे सांगितले आहे.

Indian players
ENG vs IND: विराट बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या चाहत्यांची पुन्हा हुल्लडबाजी

ईसीबीला आपेक्षा होती की, ओल्ड टॅफोर्डमध्ये 21,000 प्रेक्षकांची क्षमता असणारे प्रेक्षागृह रिक्त राहणार नाही. सामना रद्द झाल्यामुळे तिकिटांचे नुकसान सहन करावे लागत आहे. या व्यतिरिक्त, प्रसारण महसुलात सुमारे 30 दशलक्ष पौंड (304 कोटी) चे नुकसान झाले आहे. उपलब्ध माहितीनुसार, ईसीबीने चर्चेदरम्यान बीसीसीआयला सांगितले की, ते या नुकसानाची जबाबदार असतील.

दुसरीकडे, बीसीसीआय देखील ईसीबीवर नाराज आहे. बीसीसीआयचे म्हणणे आहे की जेव्हा त्यांनी गुरुवारी कसोटी सामना रद्द करण्यास सांगितले होते तेव्हा मालिका 2-2 ने बरोबरीत राहिली असती. याशिवाय खेळाडूंना ओल्ड टॅफोर्डमध्ये जाण्याची गरज राहीली नसती.

दुसरे कारण - गेल्या आठवड्यात ओव्हल कसोटीच्या दोन दिवस आधी लंडनमध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्यावेळी उपस्थित राहून कोविडच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल बीसीसीआय आणि भारतीय संघाच्या निर्णयामुळे ईसीबीने निराश व्यक्त केली. ECB च्या मते, भारतीय शिबिरात या कार्यक्रमानंतर कोरोनाचा पसरला आहे.

Indian players
Eng Vs Ind: भारत कसोटी मालिकेत 2 - 1 ने आघाडीवर

परमार यांनी या दरम्यान कोणत्या खेळाडूंवर उपचार केले?

परमारने ओव्हल कसोटी आणि मँचेस्टरमध्ये रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांच्यासह अनेक खेळाडूंवर उपचार केले होते.

भारतीय खेळाडूंना आता मँचेस्टरच्या रॅडिसन हॉटेलमध्ये विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले त्यानंतर मात्र त्यांना बायो-बबलमध्ये हलवण्यात आले आहे. ते तेथे बायो-बबलमध्ये राहतील आणि नंतर चार्टर्ड फ्लाइटद्वारे आयपीएल 2021 साठी यूएईला पोहोचतील. बीसीसीआयच्या सूत्रांनी इनसाइडस्पोर्टला सांगितले की, त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले जात असून आणि जोपर्यंत तो यूएईमध्ये आयपीएल 2021 च्या चार्टर्ड फ्लाइटमध्ये सामील होत नाही तोपर्यंत त्यांची दररोज चाचणी करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com