भारतीय मंडळ देखील पूर्वीप्रमाणेच ECBशी आपले संबंध टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. जय शहा यांनी याला चांगली ऑफर म्हटले आहे. Dainik Gomantak
क्रीडा

ENG vs IND: ईसीबीला नुकसान भरपाई देण्यासाठी BCCIची मोठी ऑफर

बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आता 22 किंवा 23 सप्टेंबरला इंग्लंडला जाऊ शकतात आणि ECBशी 407 कोटी रुपयांच्या या नुकसानीबद्दल बोलू शकतात.

दैनिक गोमन्तक

ENG vs IND: मँचेस्टर कसोटी (Manchester Test) रद्द झाल्यामुळे इंग्लंडला (England) 407 कोटींचे नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई देण्यासाठी बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jai Shah) यांनी ECB ला मोठी ऑफर दिली आहे. इंग्लंड विरुध्द भारत यांच्यातील कसोटी मालिकेचा शेवटचा कोरोनामुळे (Covid-19) रद्द झाला. यामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) 40 दशलक्ष पौंड (सुमारे 407 कोटी रुपये) चे नुकसान झाले आहे. ECBने ही रक्कम भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) दंड म्हणून मागितली आहे. आता बीसीसीआय सचिव जय शहा यांच्याकडून यासंदर्भात एक निवेदन आले आहे.

जय शाह यांच्या मते, भारतीय मंडळाने ECBला पुढील वर्षी इंग्लंडमध्ये दोन टी -20 सामने अधिक खेळण्याची ऑफर दिली आहे. किंवा टी -20 ऐवजी एक कसोटी सामनाही खेळला जाऊ शकतो. या ऑफरद्वारे, भारतीय मंडळ देखील पूर्वीप्रमाणेच ECBशी आपले संबंध टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. जय शहा यांनी याला चांगली ऑफर म्हटले आहे.

अशा प्रकारे वेळापत्रक ठरवले गेले

टीम इंडिया पुढील वर्षी जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात 3 टी -20 आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाईल. भारताचा दौरा 1 जुलै रोजी ओल्ड ट्रॅफर्ड येथे टी -20 सामन्याने सुरु होईल. दुसरा टी 20 सामना ट्रेंट ब्रिज (3 जुलै) आणि तिसरा सामना अगियस बाउल 6 जुलैला खेळला जाईल. तीन एकदिवसीय मालिका एजबॅस्टन (9 जुलै), द ओव्हल (12 जुलै) आणि लॉर्ड्स (14 जुलै) येथे खेळल्या जातील.

आता जय शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने ईसीबीला मोठी ऑफर दिली आहे. जेव्हा आपण पुढच्या वर्षी जुलैमध्ये इंग्लंडला जाऊ, तेव्हा 3 ऐवजी 5 टी -20 सामन्यांची मालिका खेळू. जर त्यांना टी -20 खेळायचे नसेल तर आम्ही पर्याय म्हणून इंग्लंडसोबत एक कसोटी सामना खेळू शकतो. त्यांनी दोनपैकी कोणती ऑफर निवडावी हे त्यांच्यावर अवलंबून आहे.

ईसीबीशी बोलण्यासाठी सौरव गांगुली इंग्लंडला जाणार?

ईसीबीला आशा होती की ओल्ड टॅफोर्ड येथे 21 हजार प्रेक्षकांच्या क्षमतेसह कसोटी सामन्यादरम्यान जागा रिक्त राहणार नाही. त्यांना तिकिटांचे 102 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय, प्रसारण महसुलात सुमारे 30 दशलक्ष पौंड 304 कोटींचे चे नुकसान झाले. ईसीबीने बीसीसीआयला एका संभाषणादरम्यान सांगितले की ते या नुकसानास जबाबदार असतील. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आता 22 किंवा 23 सप्टेंबरला इंग्लंडला जाऊ शकतात आणि ईसीबीशी 407 कोटी रुपयांच्या या नुकसानीबद्दल बोलू शकतात.

खरं तर, 9 सप्टेंबर रोजी, मँचेस्टर टेस्टच्या एक दिवस आधी, भारतीय संघाचे सहाय्यक फिजिओ योगेश परमार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. यामुळे, काही भारतीय खेळाडूंनी 10 सप्टेंबर रोजी सामन्यापूर्वी फक्त 2 तास मैदानावर जाण्यास नकार दिला. या कारणास्तव, ईसीबीने 5 वी कसोटी रद्द करण्याची घोषणा केली होती. भारतीय संघ 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. ईसीबीने या मालिकेबद्दल आणि शेवटच्या कसोटीवर लवकर निर्णय घेण्यासाठी आयसीसीला पत्रही लिहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Market: 200 वर्षांची परंपरा धोक्यात! 'भायले' व्यापारी आल्याने गोमंतकीय दुकानदारांचा व्यवसाय थंड

Cricket Players Death: क्रीडा विश्वात खळबळ! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू, बोर्डानं घेतला मोठा निर्णय

गुंड जेनिटोची दिवाळी तुरुंगातच; रामा काणकोणकर हल्लाप्रकरणी सर्व संशयितांना 31 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

सीटवरुन झाला वाद, भावांनी ट्रेनमध्ये बॉम्बची अफवा पसरवली; अम्रपाली एक्सप्रेसमध्ये धावपळ, पोलिसांची उडाली तारांबळ

60 कोटींची टांगती तलवार, शिल्पा शेट्टीचं गोव्यात 'होम-हवन'! बास्टियनची पारंपरिक सुरुवात

SCROLL FOR NEXT