Ranji Cricket  dainikgomantak
क्रीडा

Ranji Cricket : गोव्याचे आघाडीसाठी प्रयत्न

Ranji Cricket : सौराष्ट्रविरुद्ध १०८ धावांनी मागे, सहा विकेट बाकी

दैनिक गोमन्तक

पणजी : सौराष्ट्रचा पहिला डाव शुक्रवारी सकाळी लवकर गुंडाळल्यानंतर गोव्याचे आघाडीसाठी प्रयत्न सुरू झाले. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाअखेर ते अजून १०८ धावांनी मागे असून सहा विकेट बाकी आहेत. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ड गटातील सामना मोटेरा-अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. (Efforts for Goa's lead continue)

सौराष्ट्रचा पहिला डाव कालच्या ७ बाद ३४३ धावांवरून शुक्रवारी सकाळी २.४ षटकांत आणखी चार धावांची भर टाकून ३४७ संपुष्टात आला. शेल्डन जॅक्सन (९७) व धर्मेंद्रसिंह जडेजा हे कालचे नाबाद फलंदाज तीन चेंडूंच्या फरकाने धावबाद झाल्यामुळे गोव्याचे काम सोपे झाले. नंतर सुयश प्रभुदेसाई (६४), शुभम रांजणे (नाबाद ५९), एकनाथ केरकर (नाबाद ५२) यांची अर्धशतके, तसेच अमोघ देसाईच्या (४७) दमदार फलंदाजीमुळे गोव्याने (Goa) दुसऱ्या दिवसाअखेर पहिल्या डावात ४ बाद २३९ धावा केल्या. (Efforts for Goa's lead continue)

गोव्याच्या संघात पुनरागमन करणारा सलामीवीर आदित्य कौशिक (६) याला चेतन सकारिया याने यष्टिरक्षक स्नेल पटेलकरवी झेलबाद केले. सुरवातीच्या झटक्यानंतर अमोघ व सुयश यांनी गोव्याला सावरताना दुसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. अर्धशतकाच्या वाटेवर असताना पार्थ भूत याच्या गोलंदाजीवर अमोघने यष्टिरक्षकाकडे (wicketkeeper) झेल दिला. नंतर धर्मेंद्रसिंह जडेजा याने गोव्याचा कर्णधार (Captain) स्नेहल कवठणकर (७) याला पायचीत बाद केल्यामुळे गोव्याला जोरदार धक्का बसला. सुयशने शुभम रांजणेसह चौथ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी करून गोव्याची घसरगुंडी थांबवली. मात्र डावखुरा फिरकी गोलंदाज भूत याने सुयशला पायचीत केल्यामुळे सौराष्ट्रचे पारडे जड झाले. त्यानंतर शुभम व एकनाथ या माजी ‘मुंबईकर’ (Mumbai) रणजीपटूंनी (Ranji) गोव्याच्या संघाचा डोलारा सांभाळताना पाचव्या विकेटसाठी ९० धावांची अभेद्य भागीदारी केली.

संक्षिप्त धावफलक

सौराष्ट्र, पहिला डाव : ८७.४ षटकांत सर्वबाद ३४७ (शेल्डन जॅक्सन ९७, धर्मेंद्रसिंह जडेजा २५).

गोवा, पहिला डाव : ८५ षटकांत ४ बाद २३९ (अमोघ देसाई ४७- १०५ चेंडू, ९ चौकार, आदित्य कौशिक ६, सुयश प्रभुदेसाई ६४- १४३ चेंडू, ७ चौकार, १ षटकार, स्नेहल कवठणकर ७, शुभम रांजणे नाबाद ५९- १३७ चेंडू, २ चौकार, २ षटकार, एकनाथ केरकर नाबाद ५२- ८९ चेंडू, ६ चौकार, चेतन सकारिया १-३५, धर्मेंद्रसिंह जडेजा १-६३, पार्थ भूत २-६९).

मालिका अर्धशतकांची...

- सुयश प्रभुदेसाईची मोसमात २, तर रणजी (Ranji Cricket) कारकिर्दीत ८ अर्धशतके

- एकनाथ केरकरची गोव्यासाठी ५ डावात ४ अर्धशतके, एकंदरीत ५ अर्धशतके

- शुभम रांजणेचे गोव्यातर्फे पहिलेच अर्धशतक, एकूण ५ अर्धशतके

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT