FC Goa team players during practice Dainik Gomantak
क्रीडा

Durand Cup 2023 : एफसी गोवासमोर शिलाँग लाजाँगचे आव्हान

विजयासह मोहिमेला सुरवात करण्यास मार्केझ इच्छुक

किशोर पेटकर

FC Shillong Lajong VS FC Goa : यावेळच्या ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेतील मोहिमेस विजयाने सुरवात करण्यास मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवा संघ इच्छुक आहे, पण त्यासाठी त्यांना धोकादायक शिलाँग लाजाँग एफसीचे आव्हान परतावून लावावे लागेल. ‘ड’ गट सामना मंगळवारी (ता. 8) गुवाहाटी येथे खेळला जाईल.

एफसी गोवा संघाने 2021 साली ड्युरँड कप जिंकला, पण गतवेळी त्यांचे आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आले. स्पॅनिश प्रशिक्षक मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील मंगळवारी एफसी गोवा संघ पहिली स्पर्धा खेळण्यास मैदानात उतरेल. यावेळेस त्यांनी पूर्ण ताकदीनिशी संघ स्पर्धेसाठी पाठविला आहे.

ड्युरँड कप जिंकण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. दुसरीकडे शिलाँग लाजाँग एफसीने गतमोसमात आय-लीग स्पर्धेच्या द्वितीय विभागात बाजी मारून आगामी आय-लीग स्पर्धसाठी पात्रता मिळविली आहे.

काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत मार्केझ यांनी शिलाँग लाजाँग संघ धोकादायक असल्याचे नमूद केले होते. हा संघ मैदानावर खेळताना खूप वेगाने धावतो याकडे त्यांनी लक्ष वेधले.

स्पर्धेतील पहिल्या लढतीत शिलाँग लाजाँगला नॉर्थईस्ट युनायटेडने ४-० फरकाने सहजपणे नमविले होते, पण त्यामुळे एफसी गोवा त्यांना कमी लेखण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण ते आयएसएल स्पर्धेपूर्वी नव्याने संघ बांधणी करत असून पाचपैकी चार परदेशी खेळाडू संघात नवखे आहेत.

गतमोसमात ११ गोल व नऊ असिस्ट अशी देखणी कामगिरी केलेला मोरोक्कन नोआ सदावी संघातील प्रमुख खेळाडू आहे. शिलाँग येथील संघ मंगळवारी साखळी फेरीतील दुसरा सामना खेळणार असून एफसी गोवाचा पहिलाच सामना आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT