FC गोवाचा किंगफिशर सहयोगी प्रायोजक; ISL च्या तीन हंगामांसाठी करार

हिरो इंडियन सुपर लीगच्या आगामी सीझनमध्ये किंगफिशरचे नाव आणि लोगो एफसी गोवा शर्टच्या पेंडंटवर दिसेल.
Kingfisher renews partnership with FC Goa as Associate Sponsor
Kingfisher renews partnership with FC Goa as Associate SponsorDainik Gomantak

Kingfisher renews partnership with FC Goa as Associate Sponsor

हिरो इंडियन सुपर लीगच्या 2023 ते 2026 या तीन हंगामांसाठी किंगफिशरने FC गोवा सोबत सहयोगी प्रायोजक म्हणून नूतनीकरण केल्याची घोषणा केली आहे.

FC गोवा इंडियन सुपर लीग (ISL) मधील एक यशस्वी फुटबॉल क्लब आहे. टीमसोबत पुन्हा सहयोगी प्रायोजक म्हणून एकत्र किंगफिशर कंपनीला अभिमान वाटत असल्याचे कंपनीच्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

हिरो इंडियन सुपर लीगच्या आगामी सीझनमध्ये किंगफिशरचे नाव आणि लोगो एफसी गोवा शर्टच्या पेंडंटवर दिसेल. तसेच, किंगफिशर FC गोवा मर्चेंडाईजची एक खास ओळ देखील 'गौर'सह सहयोगी पद्धतीने प्रसिद्ध करेल.

एफसी गोवा सोबत सहयोगी प्रायोजक म्हणून सहकार्य करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. गोवा हे देशातील सर्वोच्च सांस्कृतिक केंद्रांपैकी एक आहे. आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आणि सामाजिक संबंध वाढवण्यासाठी गुड टाईम्स चालू ठेवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. असे युनायटेड ब्रुअरीजचे मुख्य विपणन अधिकारी विक्रम बहल म्हणाले.

Kingfisher renews partnership with FC Goa as Associate Sponsor
'मुलगा जिंवत हवा असल्यास 20 लाख द्या', सट्टा चालकांनी छत्तीसगडच्या युवकाला गोव्यात ठेवले ओलीस

किंगफिशरचे सहयोगी प्रायोजक म्हणून पुन्हा स्वागत करताना एफसी गोवाला आनंद होत आहे. असे याप्रसंगी बोलताना, FC Goa चे कमर्शिअल हेड अरनॉल्ड विल्सन म्हणाले.

पुढील हंगामात, FC Goa आणि Kingfisher यांचे फॅन अनुभव निर्माण करण्याचे उद्दिष्ट असेल. मॅच डे ऍक्टिव्हेशन्स, मॅच स्क्रिनिंग, विशिष्ट अनुभवांसाठी एक खास मर्चेंडाईज लाइन यासह प्रेक्षकांना सामन्यांसाठी खास अनुभव देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असे विल्सन यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com