FC Goa-देवेंद्र मुरगावकर Dainik Gomantak
क्रीडा

‘एफसी’ गोवाला देवेंद्रचा शानदार गोल!

एफसी गोवाने काल शनिवारी रात्री इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

दैनिक गोमन्तक

FC Goa: देवेंद्र मुरगावकर याने सामन्यातील 20 मिनिटे बाकी असताना नोंदविलेल्या शानदार गोलच्या बळावर एफसी गोवाने (FC Goa) काल शनिवारी रात्री इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांनी सलग तिसरा पराभव स्वीकारलेल्या बंगळूर एफसीवर (Bengaluru FC) 2-1 फरकाने मात केली. धसमुसळा खेळ झालेल्या लढतीत दोन्ही संघाच्या प्रत्येकी एका खेळाडूस रेड कार्ड मिळाले.

बांबोळी येथील ॲथलेटिक्स (Athletics) स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात एकूण आठ यलो, तर दोन रेड कार्ड दाखविण्यात आली. स्पर्धेत पहिले तीन सामने गमावलेल्या एफसी गोवाने लागोपाठ दुसऱ्या सामन्यात विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले. त्यांचे आता पाच लढतीनंतर सहा गुण झाले असून ते सातव्या स्थानी आले आहेत. बंगळूरला एकंदरीत चौथा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे सहा लढतीनंतर त्यांचे चार गुण कायम राहिले व दहाव्या क्रमांकावर घसरण झाली.

आशिकचा पुन्हा स्वयंगोल

बंगळूरच्या आशिक कुरुनियान याच्या स्वयंगोलमुळे एफसी गोवास 16व्या मिनिटास आघाडी मिळाली. ग्लॅन मार्टिन्सच्या हेडिंगवर देवेंद्र मुरगावकरचा फटका गोलरक्षक गुरप्रीत संधूने रोखला असता रिबाऊंडवर आशिकने चेंडू स्वतःच्या संघाच्या नेटमध्ये मारला. आशिकचा यंदाच्या स्पर्धेतील हा दुसरा स्वयंगोल ठरला. त्याने बांबोळी येथेच केरळा ब्लास्टर्सविरुद्ध स्वयंगोल केला होता.

एफसी गोवाचे सेटपिस अपयश

एफसी गोवाचे सेटपिसेस अपयश या लढतीतही कायम राहिले. ब्राझीलियन क्लेटन सिल्वा याने थेट फ्रीकिकवर 45व्या मिनिटास गोल करून एफसी गोवाच्या बचावातील त्रुटी स्पष्ट केल्या. यावेळी गोलरक्षक धीरज सिंगला प्रयत्न करूनही चेंडू अडवता आला नाही. क्लेटनचा हा यंदाच्या सहा सामन्यातील तिसरा गोल ठरला.

देवेंद्रचा गोल निर्णायक

एफसी गोवाचा 23 वर्षीय आघाडीपटू देवेंद्र मुरगावकर याने बंगळूरचा बचाव विस्कळित झाल्याची संधी साधत संघाला 70व्या मिनिटास आघाडीवर नेले. इव्हान गोन्झालेझच्या असिस्टवर देवेंद्रने चाणाक्षपणे फटका मारत बंगळूरचा गोलरक्षक गुरप्रीत संधूला चकविले. त्याचा यंदाचा हा पहिला, तर एकंदरीत दुसरा आयएसएल गोल ठरला.

सामन्यात दोन रेड कार्ड

सामन्याच्या 55व्या मिनिटास एफसी गोवाचा एक खेळाडू रेड कार्डमुळे कमी झाला. यावेळी बंगळूरच्या सुरेश वांगजामने स्पॅनिश खेळाडू होर्गे ओर्तिझ धोकादायक टॅकल केल्यानंतर, दोन्ही खेळाडू एकमेकांना भिडले. रेफरी प्रांजल बॅनर्जी यांनी आपल्या साहाय्यकांशी चर्चा करून ओर्तिझला रेड कार्ड, तर सुरेशला यलो कार्ड दाखविले. 84व्या मिनिटास एदू बेदियास टॅकल केल्यामुळे सुरेशला आणखी एक यलो कार्ड मिळाले व तो रेड कार्डसह मैदानाबाहेर केला. त्यामुळे बंगळूरचाही एक खेळाडू कमी झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT