आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असलेली कोट्यवधी रुपये किंमतीची व्हेल माशाची उलटी बांदा बाजारपेठेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून जप्त केली आहे. याप्रकरणी गोवा राज्यातील तीन संशयितांना ताब्यात घेतले असून सुमारे 5 कोटी 32 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. (3 arrested from Sindhudurg in whale fish vomiting smuggling case)
ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे काँन्टन्टिनो फिलोमिनो फर्नांडिस (रा. मडगाव), जुझे जोस पॅरिस (रा. मडगाव), आणि तनीष उदय राऊत अशी आहेत. व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी काहीजण बांदा परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बांदा येथील गांधी चौक, बाजारपेठ परिसरात सापळा रचला आणि गोव्यातील तीन संशयितांना स्वीप्ट कार व मोटारसायकलसह ताब्यात घेतले. संशयितांनी एका पिशवीमधून 5 किलो 232 ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी आणली होती. त्याची किंमत सुमारे 5 कोटी 32 लाख 20 हजार रुपये आहे. ही उलटी पोलिसांनी जप्त केली. तिन्ही संशयितांना ताब्यात घेत वन्य प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरूआहे.
ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक, राजेंद्र दाभाडे, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.