पॅरिस : पॅरिसमध्ये (Paris) सुरु असलेल्या तिरंदाजीच्या विश्वचषक स्पर्धेत (Archery World Cup) भारताची तिरंदाज दीपिका कुमारीने (Deepika Kumari) जबरदस्त कामगिरी करत एकाच दिवसात दोन सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. रिकर्व्ह सामन्यात कोमलिका बारी आणि अंकिता भक्तने सुवर्ण पदक (GoldMedal) मिळवले. त्यानंतर पती अतानू दास (Husband Atanu Das) सोबत मिश्र दुहेरीत जेते पदावर नाव कोरले.
दीपिकाने पहिल्याच विश्वचषकचा टप्पा ३ तिरंदाजी रिकर्व्ह सामन्यात दीपिकाने कोमनिका बारी आणि अंकिता भक्त यांच्यासह सुवर्ण पदक पटाविले. अंतिम सामन्यात भारतीय संघाने मॅक्सिकोला पराभूत केले. या सामन्यात भारतीय संघाने पाच सेटमध्ये मॅक्सिकोचा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले.
काहीदिवसांपूर्वी भारतीय महिला रिकर्व्ह संघ ऑलिंपिकसाठी पत्र ठरु शकली नाही. या दुखःतून बाहेर येत भारतीय संघाने सुवर्ण पदक जिंकत आपले इरादे स्पष्ट केले आहेत. दीपिका ही एकमात्र महिला तिरंदाज आहे, जिने टोकियो ऑलिंपिकस्पर्धेत स्थान मिळविले आहे.
विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात रविवारी दीपिकाने जबरदस्त कामगिरीच्या जोरावर दोन पदके आपल्या नावावर केली आहेत. मिश्र दुहेरीच्या रिकर्व स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दीपिकाने पती अतानु दास यांच्यासोबत दुसरे सुवर्ण पदक मिळविले. दीपिका आणि अतानु या जोडीने नेदरलँडच्या जोडीला ५-३ च्या फरकाने मात देत पदक मिळविले. हा सामना खूप रोमांचक झाला, एकवेळ २-२ अशा बरोबरीत सामना सुरु होता. पण त्यानंतर दीपिका आणि अतानु यांनी लागोपाट तीन सेट जिंकत सामन्यात बाजी मारली आणि सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.