नवी दिल्ली : देशातील खेळाच्या सर्व प्रकारातील 148 खेळाडूंना कोरोनावरील (Covid-19) लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. यामध्ये ऑलिंपिक (Olympic) पात्र खेळाडूंचा देखील समावेश असल्याची माहिती भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष (IOA) डॉ. नरिंदर बात्रा दिली आहे. (Vaccination of Olympic qualified teammates)
डॉ. बात्रा म्हणाले, लस घेतलेल्या 148 खेळाडूंपैकी 17 खेळाडूंना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. यात ऑलिंपिक पात्र खेळाडूंची संख्या जास्त आहे.
याशिवाय पॅरा ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या 12 खेळाडूंना लसीचा पहिला डोस मिळाला असून, अन्य 2 दोन जाणांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. पॅरा ऑलिंपिक स्पर्धा 24 ऑगस्टपासून टोकियोमध्ये (Tokyo) होणार आहेत. अपंग खेळाडूंसह एकूण 163 खेळाडूंना 20 मे पर्यंत पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच 87 पदाधिकऱ्यांना देखिल लसीचा डोस देण्यात आला असून त्यातील 23 पदाधिकाऱ्यांचे दोन्ही डोस झाले आहेत.
90 हून आधिक खेळाडू टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरले आहेत. ही स्पर्धा मागिल वर्षी कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली होती. ऑलिंपिकसाठी पात्र भारतीय नेमबाज सध्या क्रोएशियात सराव करीत असून त्यांना तेथे लस देण्यात येणार आहे. तेथूनच ते ऑलिंपिकसाठी टोकियोमध्ये जातील. यातील काही जणांनी या आधीच लसीचा पहिला डोस घेतला आहे. तलवारबाजीत पहिल्यांदाच पात्र ठरलेली भवानी देवी सद्या इटलीत तर वेटलिफ्टिंगची खेळाडू मिगाबाई चानू अमेरीकेत सराव करत आहे. त्यांना तेथेच लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.