Team India X/BCCI
क्रीडा

SA vs IND: चालू द. आफ्रिका दौऱ्यादरम्यान टीम इंडियात पाच बदल! 'हे' गोलंदाज बाहेर, तर कोचही बदलले

Pranali Kodre

India Tour of South Africa, Changes for ODI and Test Series:

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात तीन सामन्यांची टी20 मालिका संपली आहे. आता 3 सामन्यांची वनडे मालिका आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका होणे बाकी आहे. अशातच टीम इंडियात मोठे बदल झाले आहेत.

या दौऱ्यातील 17 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेसाठी वेगवान गोलंदाज दीपक चाहरचा भारतीय संघात समावेश होता. पण त्याने कुटुंबात मेडिकल एमर्जन्सी आल्याने या मालिकेतून माघार घेतली आहे. त्यामुळे त्याच्या जागेवर बदली खेळाडू म्हणून आकाश दीपची निवड करण्यात आली आहे.

शमीही दौऱ्यातून बाहेर

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टी२० आणि वनडे मालिकेसाठी समावेश नव्हता, पण कसोटी मालिकेसाठी त्याची निवड झाली होती. मात्र त्याचा समावेश त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून होता.

परंतु आता बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार शमी त्याच्या पायाला झालेल्या दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे.

श्रेयस अय्यरलाही केले जाणार मुक्त

भारताचा फलंदाज श्रेयस अय्यर वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असेल. पण त्यानंतर तो दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यासाठी उपलब्ध नसेल. पहिल्या वनडेनंतर श्रेयस कसोटी मालिकेच्या तयारीसाठी कसोटी संघाबरोबर जोडला जाईल. त्याचमुळे तो दुसरा आणि तिसरा वनडे सामना खेळणार नाही.

कोचिंग स्टाफमध्येही बदल

भारतीय संघाच्या नियमित कोचिंग स्टाफमधील मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप हे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी भारतीय कसोटी संघाबरोबर असतील, त्याचमुळे ते वनडे मालिकेत खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंबरोबर नसतील.

वनडे मालिकेदरम्यान भारतीय अ संघाचा कोचिंग स्टाफ भारताच्या वनडे संघाला मार्गदर्शन करणार आहे. या कोचिंग स्टाफमध्ये फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक, गोलंदाजी प्रशिक्षक राजीब दत्ता आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक अजय रात्रा यांचा समावेश आहे.

भारताचा बदललेला वनडे आणि कसोटी संघ -

  • वनडे मालिकेसाठी भारतीय संघ: ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार/कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि आकाश दीप.

  • कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज , मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) आणि प्रसिद्ध कृष्णा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT