David Warner Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: डेव्हिड वॉर्नरला शिकायचायं पंतकडून 'तो' शॉट

ऑस्ट्रेलियाचा महान सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे.

दैनिक गोमन्तक

ऑस्ट्रेलियाचा महान सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे. यापूर्वी, तो हैदराबाद संघाचा भाग होता. 2009 मध्ये, त्याने दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) आयपीएलमध्ये (IPL 2022) आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या मोसमात, तो ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखाली दिल्लीकडून खेळताना दिसत आहे. वॉर्नर यावेळी म्हणाला की, 'मी पंतच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. पंत एका हाताने शॉट्स कसा खेळतो ते मला शिकायचे आहे.'

डेव्हिड वॉर्नर म्हणाला की, ''मला ऋषभ पंतकडून एका हाताने शॉट्स खेळण्याची कला शिकायची आहे. त्याचवेळी तो भारतीय संघाचा अविभाज्य भाग आहे. पुन्हा एकदा जुन्या संघात पुनरागमन करताना खूप छान वाटत आहे, ज्यामध्ये काही जुने चेहरे आहेत, आणि काही नवीन चेहऱ्यांचा संघात समावेश झाला आहे.''

दरम्यान, गेल्या मोसमापर्यंत वॉर्नर सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता. मात्र या मोसमात त्याला दिल्लीने 6.25 कोटींमध्ये खरेदी केले आहे. विश्वचषक विजेत्या खेळाडूला DC ने IPL मेगा लिलावात 6.25 कोटींना विकत घेतले.

आयपीएलमध्ये पाचव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा वॉर्नर म्हणाला की, ''मी डीसीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. डीसीसोबत रिकीला खूप यश मिळाले आहे. ऑस्ट्रेलियासाठी तो एक महान क्रिकेटर आहे. आता दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रशिक्षक म्हणून आपली कामगिरी बजावत आहे.'' 2022 मध्ये, DC ने संमिश्र सुरुवात केली आहे, जिथे त्यांनी त्यांच्या दोन सामन्यांपैकी एक जिंकला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT