MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni Video: आयपीएल 2023 साठी 'कॅप्टनकूल' सज्ज, नवा लूक होतोय प्रचंड व्हायरल

आयपीएल 2023 हंगामासाठी सराव करतानाचा धोनीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Pranali Kodre

MS Dhoni: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचे बिगूल वाजले आहे. गेल्या महिन्यात आयपीएलच्या या 16 व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलावही पार पडला होता. त्यानंतर आता संघ हा हंगाम खेळण्यासाठी सज्ज आहे, त्यातच चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीनेही या हंगामासाठी सरावाला सुरुवात केली आहे. याचदरम्यान, त्याचा नवा लूकही सध्या चर्चेत आला आहे.

एमएस धोनी हा भारतातीलच नाही, जर जगातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यातच तो त्याच्या लूकमुळे तर अगदी त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच चर्चेत असतो.

नुकताच आयपीएल 2023 च्या सरावावेळीचे त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये धोनीची दाढी वाढलेली दिसत आहे. तसेच त्याच्या दाढीचे केस पांढरे झाले आहेत. त्याच्या या फोटोंवर चाहत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत.

(CSK captain MS Dhoni start training ahead of IPL 2023)

धोनीचा सरावाचा व्हिडिओ व्हायरल

धोनीचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमधून धोनीने आगामी आयपीएल हंगामासाठी तयारी सुरू केली असल्याचे समजत आहे. या व्हिडिओमध्ये धोनी नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे.

त्याच्या अनेक चाहत्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात धोनी मोठमोठे शॉट्स खेळतानाही दिसत आहे. धोनी नेहमीच त्याच्या मोठ्या शॉट्ससाठी ओळखला जातो. त्यामुळे आता आगामी हंगामातही चाहत्यांना त्याचा आक्रमक अंदाज पाहाण्याची अपेक्षा असेल.

तसेच असेही म्हटले जात आहे की हा आयपीएल हंगाम धोनीचा अखेरचा आयपीएल हंगाम असेल. कारण गेल्यावर्षी धोनीने सांगितले होते की त्याला घरच्या चाहत्यांसमोर अखेरचा सामना खेळायचा आहे. गेल्यावर्षी आयपीएल हंगामातील दुसऱ्या हाफमधील सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात आले होते.

धोनीने आत्तापर्यंत चेन्नई सुपर किंग्सने खेळलेल्या प्रत्येक हंगामात संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने चेन्नईला चारवेळा विजेतेपद देखील जिंकून दिले आहे. आता या हंगामात चेन्नई पाचव्यांदा विजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असेल.

या हंगामासाठी चेन्नईने इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्सला संघात सामील करून घेतले आहे. त्याच्यासाठी चेन्नईने आयपीएल 2023 लिलावात 16.25 कोटी रुपये मोजले आहेत.

आयपीएल 2023 साठी चेन्नई सुपर किंग्सचा संघ - अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, काइल जेमिसन, निशांत सिंधू, शेख रशीद, भगत वर्मा, अजय मंडल, एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगारगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथिशा पाथिराना , सिमरजीत सिंग, दीपक चाहर, प्रशांत सोळंकी, महिश तिक्षणा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

SCROLL FOR NEXT