Cristiano Ronaldo Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup च्या धामधूमीत रोनाल्डो अन् मँचेस्टर युनायटेडचे मार्ग झाले वेगळे!

Cristiano Ronaldo: ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि युरोपियन क्लब मँचेस्टर युनायटेड यांनी परस्पर सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Cristiano Ronaldo leaves Manchester United: एकिकडे फिफा वर्ल्डकप सुरु असतानाच दुसरीकडे दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि युरोपियन क्लब मँचेस्टर युनायटेड यांनी परस्पर सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल मँचेस्टर युनायटेडने स्पष्टीकरण दिले आहे.

खरंतर रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेड यांच्यातील संबंध यापूर्वीच बिघडल्याचे दिसले होते, त्यामुळे ते वेगळे होतील, अशी अनेकांना अपेक्षा होती. त्यामुळे अनेकांच्या अपेक्षेनुसार अखेर रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायडेटचे मार्ग वेगळे झाले आहेत. यापूर्वी रोनाल्डोने एका मुलाखतीदरम्यान युनायटेड आणि संघाचे मॅनेजर एरिक टेन हॅग यांच्यावर टीका केली होती. त्यानंतरच त्यांच्यातील संबंध बिघडल्याची चर्चा सुरू झाली होती.

दरम्यान, मँचेस्टर युनायटेडने (Manchester United) जाहीर केलेल्या प्रतिद्धी पत्रकात म्हटले आहे की 'परस्पर सहमतीने ख्रिस्तियानो रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेडची साथ सोडली आहे. त्याने क्लबबरोबरील दोन्ही वेळच्या करारादरम्यान 346 सामन्यांतील 145 गोलांसह दिलेल्या अफाट योगदानाबद्दल क्लब आभारी आहे. चांगल्या भविष्यासाठी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला शुभेच्छा'.

रोनाल्डो (Cristiano Ronaldo) यापूर्वी त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाही मँचेस्टर युनायटेड क्लबकडूनच खेळला होता. पण त्यानंतर तो दिर्घकाळासाठी रियल मद्रीदकडून खेळला. त्यानंतर तो काही सामने जुवेंटसकडूनही खेळला. यानंतर तो पुन्हा मँचेस्टर युनायटेड संघात परतला होता.

रोनाल्डोनेही करार संपल्यानंतर सांगितले आहे की 'माझे मँचेस्टर युनायटेड आणि चाहत्यांवर खूप प्रेम आहे, ते प्रेम कधीही बदलणार नाही. पण आता नवीन आव्हान स्विकारण्याची योग्य वेळ आली आहे. मी संघाला उर्वरित हंगामासाठी आणि भविष्यासाठी शुभेच्छा देतो.'

सध्या रोनाल्डो पोर्तुगाल संघासह फिफा वर्ल्डकपमध्ये सहभागी झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha in Konkani: वाल्लोर! लोकसभेचं कामकाज कोकणीत होणार; इतिहासात पहिल्यांदाच संसदेत 'गोव्याचा' आवाज दुमदुमणार

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

The Hundred League: 13 चेंडूत 50 धावा...! लियम लिविंगस्टन-जेकब बेथेल जोडीने मोडला 136 वर्ष जुना रेकॉर्ड; ‘द हंड्रेड’मध्ये केला मोठा धमाका

Goa Crime: 'इन्स्टा'वरून युवतींची फसवणूक, 5 अजामीन वॉरंट, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; अट्टल गुन्हेगाराची कोठडीत रवानगी

Goa Online Scam: सिंगापूरातून दिल्लीत उतरला, विमानतळावरच भामट्याला अटक; शिवोलीतील महिलेला घातला होता 1 कोटींचा गंडा

SCROLL FOR NEXT