FIFA World Cup 2022: मेस्सी, रोनाल्डो ठरतील का स्पेशल प्लेयर? 'हे' संघ फिफा वर्ल्डकपचे प्रबळ दावेदार

एफसी गोवाचे प्रशिक्षक कार्लोस पेनया यांचा विश्वास; 'कोपा'नंतर मेस्सीचे लक्ष्य 'फिफा'
FIFA World Cup 2022
FIFA World Cup 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

FIFA World Cup 2022: कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर अर्जेंटिनाला वर्ल्डकप जिंकून देण्याचे लक्ष्य स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीसमोर असेल, याशिवाय कोणते संघ यंदाच्या विश्वचषकाचे दावेदार असू शकतात, याविषयी एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेनया यांनी आपले एक्सपर्ट ओपिनियन दिले आहे.

FIFA World Cup 2022
Banned Things In FIFA WC 2022: गोलनंतर सेलिब्रेशन करताना टी-शर्ट काढण्यास बंदी; स्पर्धाकाळात 'या' गोष्टींवर निर्बंध

या वेळची फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा जरा वेगळी आहे. त्यामुळे विजेतेपद कोण पटकावू शकेल हे सांगणे जरा कठीणच आहे. स्पर्धेत खेळाडूंचा फॉर्म, त्यांची तंदुरुस्ती प्रत्येक संघासाठी महत्त्वाची असेल. नोव्हेंबरमध्ये प्रथमच फुटबॉलमधील प्रतिष्ठेची विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. व्यावसायिक फुटबॉलचा विचार करता, सध्या मोसम मध्यास आहे. क्लब पातळीवर खेळण्यास मग्न असलेले खेळाडू राष्ट्रीय संघात दाखल झाले आहेत.

विश्वकरंडकापूर्वी व्यावसायिक स्पर्धात्मक फुटबॉलमध्ये व्यग्र असलेल्या फुटबॉलपटूंमागे दुखापतींचा ससेमिरा असणे अपेक्षित आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर निश्चितच परिणाम होईल. माझ्यामते, कतारमधील स्पर्धेत खेळाडूंची तंदुरुस्ती कळीचा मुद्दा असेल. संघाच्या तयारीवरही परिणाम झालेला असेल. आपापल्या क्लबतर्फे खेळून खेळाडू थेट राष्ट्रीय संघात दाखल झालेले आहेत. विश्वकरंडकासाठी सज्ज होण्यासाठी खेळाडूंना कमीच वेळ मिळालेला आहे. जरी प्रत्येक संघाचा जोरदार दावा असला, तरी सद्यःस्थितीत एखादा संघच विश्वकरंडक जिंकेल असे छातीठोकपणे सांगता येणार नाही.

माझ्यामते, कतारमधील विश्वकरंडकात अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी स्पेशल प्लेयर ठरू शकतो. त्याला कारणही आहे. मेस्सी आता 35 वर्षांचा आहे. वय लक्षात घेता, कदाचित त्याची ही शेवटचीच विश्वकरंडक स्पर्धा असेल. पाचव्यांदा तो या वलयांकित स्पर्धेत खेळत आहे. खेळाडू या नात्याने त्याने सारे मानसन्मान मिळविले आहेत, परंतु त्याला विश्वकरंडक जिंकता आलेला नाही. निवृत्तीपूर्वी तो कतारमध्ये विश्वकरंडक उंचावण्यासाठी निश्चितच इच्छुक असेल.

विश्वकरंडकासह कारकिर्दीला पूर्णविराम देण्यासाठी मेस्सी प्रेरित असेल, त्यासाठी त्याला संघ सहकाऱ्यांचीही साथ मिळेल. साहजिकच मेस्सीचा अर्जेंटिना संघ स्पर्धेतील धोकादायक संघ असेल. गतवर्षी अर्जेंटिनाने कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली. मेस्सीच्या कारकिर्दीतील अर्जेंटिनाचे हे मोठे यश ठरले. ब्राझीलमध्ये 2014 मध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत मेस्सीचा अर्जेंटिना संघ अंतिम फेरीत दाखल झाला, परंतु त्यांना अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यामुळे सुपरस्टार खेळाडूचे स्वप्न अपूर्णच राहिले.

FIFA World Cup 2022
Controversial Moments In FIFA WC: केवळ मॅराडोनाचा 'हँड ऑफ गॉड'च नाही; तर 'हे' क्षणही फिफा वर्ल्डकपमध्ये ठरले वादग्रस्त

मेस्सीप्रमाणेच आणखी काही सुपरस्टार यावेळी विश्वकरंडक जिंकण्याची मनीषा बाळगून आहेत, त्यापैकी प्रमुख म्हणजे पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो. पोर्तुगालचा संघ गुणवान आहे, त्यामुळे त्यांना घोडदौड राखण्याची संधी आहे. कदाचित एखादा नवा चेहरा यावेळची विश्वकरंडक स्पर्धा गाजवू शकेल. सांघिक पातळीवर विचार केल्यास स्पेन, ब्राझील, अर्जेंटिना, जर्मनी, फ्रान्स हे जगज्जेतेपदासाठी दावेदार असतील. काही धक्कादायक निकालही लागू शकतात.

स्पेनचा संघ चांगली कामगिरी करत आहे. लुईस एन्रिके हे शानदार प्रशिक्षक आहेत. त्यांनी संघाची चांगणी जडणघडण केली आहे. स्पॅनिश संघात काही युवा आश्वासक चेहरे आहेत. हा संघ गेली दोन-तीन वर्षे एकत्रितपणे खेळत असून त्यांंच्यात चांगला समन्वय पाहायला मिळतो. स्पेनने 2010 मध्ये पहिल्यांदा विश्वकरंडक जिंकला होता, आता दुसऱ्यांदा तशी किमया ते साधू शकतील. स्पेन जर विश्वकरंडक जिंकण्याच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेल्यास माझा पाठिंबा अर्जेंटिनाला असेल. ते तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदासाठी दावेदार आहेत.

(कार्लोस पेनया हे आयएसएल स्पर्धेतील एफसी गोवा संघाचे मुख्य प्रशिक्षक असून, बार्सिलोनाच्या ब व क संघातील माजी खेळाडू आहेत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com