Cristiano Ronaldo Dominates Instagram: इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेला सेलिब्रिटी बनला रोनाल्डो

इतके लोक करतात फॉलो; विराट कोहली कितव्या क्रमांकावर घ्या जाणून
Cristiano Ronaldo Dominates Instagram
Cristiano Ronaldo Dominates InstagramDainik Gomantak

Cristiano Ronaldo Dominates Instagram: मँचेस्टर युनायडेट या व्यावसायिक फुटबॉल संघाचा खेळाडू आणि पोर्तुगालचा फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो हा इन्स्टाग्रामवर जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेला सेलिब्रिटी बनला आहे. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्यांच्या यादीत रोनाल्डोसह अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि भारताचा क्रिकेटपटू विराटकोहली यांचाही समावेश आहे.

Cristiano Ronaldo Dominates Instagram
Iran Football Team to be Jailed?: इराणच्या फुटबॉल संघाला होणार तुरूंगवास?

असे म्हणतात की, रोनाल्डो हा असा फुटबॉलपटू आहे ज्याच्यासोबत नेहमी कोणता ना कोणता विक्रम जोडला जात असतो. जणू रोनाल्डो आणि रेकॉर्ड हातात हात घालून जात असतात. आता रोनाल्डोला इन्स्टाग्रामवर 500 मिलियन म्हणजेच 50 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. रोनाल्डोला ट्विटरवर 105 मिलियनहुन अधिक फॉलोअर्स आहेत.

सर्वाधिक इन्स्टाग्राम फॉलोअर्स असणाऱ्यांच्या यादीत लिओनेल मेस्सी (Lionel Messi) दुसऱ्या स्थानी आहे. मेस्सीला इंस्टाग्रामवर 377 मिलियन फॉलोअर्स आहेत.

या यादीत मॉडेल आणि टीव्ही पर्सनालिटी कायली जेनर हिला 372 मिलियन फॉलोअर्ससह तिसऱ्या स्थानी आहे. तर गायिका सेलेना गोमेझ आणि द रॉक उर्फ अभिनेता ड्वेन जॉनसन चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत. विराट कोहली २०३ मिलियन फॉलोअर्ससह या यादीत सातव्या स्थानी आहेत.

Cristiano Ronaldo Dominates Instagram
Virat Kohli Instagram Posts Viral: किंग कोहलीने स्टोरीला शेअर केलेला 'हा' फोटो तुम्ही पाहिलात का?

रोनाल्डो-मेस्सीचा फोटोवर विराटची प्रतिक्रिया

फिफा वर्ल्डकप 2022 च्या उद्घाटन सोहळ्याआधी रोनाल्डो आणि मेस्सी यांचा बुद्धीबळ खेळतानाची पोज असलेला एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहोत. त्यावर भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीनेदेखील व्हॉट अ पिक्चर अशी कॉमेंट केली होती.

दरम्यान, रोनाल्डो आणि ब्रिटनचा माजी खेळाडू वेन रूनी यांच्यात झालेल्या शाब्दिक बाचाबाचीनंतर मँचेस्टर युनायडेट संघासोबत रोनाल्डोचे बिनसले आहे. तथापि, वर्ल्डकपमधील कामगिरीवर त्यामुळे फारसा प्रभाव पडणार नाही. रोनाल्डोने या क्लबचे कोच एरिक टेन हॅगवर निशाणा साधला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com