Cricket Six Viral Video Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात विचित्र 'सिक्स'! फलंदाजाने खेळलाच नाही शॉट, तरीही सीमारेषेबाहेर गेला बॉल; व्हिडिओ व्हायरल

Cricket Six Viral Video: क्रिकेटच्या मैदानावर आपण आजवर अनेक अतरंगी आणि कल्पनेपलीकडचे शॉट्स पाहिले आहेत.

Sameer Amunekar

सिडनी: क्रिकेटच्या मैदानावर आपण आजवर अनेक अतरंगी आणि कल्पनेपलीकडचे शॉट्स पाहिले आहेत. टी-२० क्रिकेटच्या आगमनानंतर फलंदाजांनी नवनवीन प्रयोगांचा सपाटा लावला असला, तरी ऑस्ट्रेलियात एका घरगुती वनडे सामन्यात जे घडले, ते पाहून खेळाडू आणि चाहते दोन्ही अवाक झाले आहेत. फलंदाजाने खरंतर चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न केला होता, पण नशिबाची साथ आणि बॅटची कड अशी काही लागली की, तो चेंडू थेट सीमारेषेबाहेर षटकारासाठी गेला.

नेमकं काय घडलं? सॅम फिनिंगचा तो अजब शॉट

ऑस्ट्रेलियातील 'डोमेस्टिक वनडे कप' स्पर्धेत वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि व्हिक्टोरिया यांच्यात सामना सुरू होता. व्हिक्टोरियाने दिलेल्या २३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर सॅम फिनिंग आणि जोएल कर्टिस मैदानात उतरले होते. पहिल्याच षटकातील पाचवा चेंडू व्हिक्टोरियाचा गोलंदाज कॅमेरून मॅकलोयरे याने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. सॅम फिनिंगने तो चेंडू सुरक्षितपणे सोडून देण्याचा (Leave) निर्णय घेतला आणि आपली बॅट वर उचलली. मात्र, चेंडू बॅटला हलकासा स्पर्श करून यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून थेट गॅलरीत जाऊन पडला. हा षटकार पाहून खुद्द सॅम फिनिंगही गोंधळला होता.

मैदानावर एकच हशा आणि आश्चर्याचा धक्का

हा शॉट पाहून गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकही हक्केबक्के झाले. चेंडू सोडण्याच्या नादात इतका मोठा षटकार मिळेल, अशी कल्पना कोणालाच नव्हती. समालोचकांनीही या घटनेचे वर्णन 'मिडास टच' असे केले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात विचित्र षटकार असल्याचे चाहते म्हणत आहेत. सामान्यतः चेंडू सोडताना बॅटची कड लागली की फलंदाज झेलबाद होतो, पण येथे नशिबाने फलंदाजाला सहा धावा बहाल केल्या.

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा दिमाखदार विजय

या रंजक घटनेनंतर वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने सामन्यावर आपली पकड घट्ट केली. २३२ धावांचे लक्ष्य त्यांनी केवळ ३९.५ षटकात ८ गडी राखून सहज गाठले. जोएल कर्टिसने सर्वाधिक ९१ धावांची खेळी केली, तर कॅमेरून बेनक्रॉफ्ट ७० धावांवर नाबाद राहिला. या विजयासह वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने आपल्या मोहिमेचा शेवट गोड केला असला तरी, अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात त्यांना अपयश आले. आता ११ मार्च रोजी तस्मानिया आणि न्यू साउथ वेल्स यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT