Goa Drowning Death: मौजमजा बेतली जीवावर! पोळे बीचवर कर्नाटकातील 19 वर्षांचा तरुण बुडाला, शोध सुरू

Goa beach drowning: काणकोणमधील शांत आणि निसर्गरम्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोळोले समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी एक हृदयद्रावक घटना घडली.
Goa Drowning Death
Goa Drowning DeathDainik Gomantak
Published on
Updated on

शांत आणि निसर्गरम्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोळे समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी एक हृदयद्रावक घटना घडली. आपल्या मित्रांसोबत पर्यटनासाठी आलेल्या कर्नाटकातील एका १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा समुद्रात पोहताना बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. समुद्राच्या जोरदार प्रवाहामुळे हा तरुण लाटांच्या विळख्यात ओढला गेल्याचे समजते.

मित्रांसोबतची सहल ठरली अखेरची

मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेला तरुण शेजारील कर्नाटक राज्यातील अंकोला येथील असून तो पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तो आपल्या मित्रांच्या एका गटासोबत दक्षिण गोव्यातील पोळे किनाऱ्यावर आला होता.

दुपारच्या सुमारास सर्व मित्र समुद्रात पोहण्याचा आनंद लुटत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. यावेळी हा तरुण लाटांचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात खेचला गेला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रवाहाचा वेग इतका प्रचंड होता की तो पाहता-पाहता डोळ्यादेखत नाहीसा झाला.

Goa Drowning Death
Goa Crime: कुंपणच शेत खातं तेंव्हा..! अपघात झाला, चालक झाला गंभीर जखमी; संधी साधून कॉन्स्टेबलने पळवले 8 लाखांचे दागिने

पोलिसांकडून शोधमोहीम

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी तातडीने मोठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. भारतीय तटरक्षक दल (Coast Guard), गोवा पोलीस आणि स्थानिक कोळी बांधव यांच्या मदतीने समुद्रात शोधकार्य राबवले जात आहे. रात्री उशिरापर्यंत या तरुणाचा शोध लागलेला नव्हता.

Goa Drowning Death
Bengaluru to Goa Vande Bharat: प्रवास सुखकर होणार! बंगळुरू ते गोवा आता फक्त 13 तासांत; रेल्वे मंत्रालयाकडून 'वंदे भारत एक्स्प्रेस'चा प्रस्ताव

जीवरक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या दुर्घटनेमुळे पोळे समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या किनाऱ्यावर जीवरक्षकांची (Lifeguards) पुरेशी उपस्थिती नसल्याने अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत.

पर्यटकांना धोक्याच्या क्षेत्राची माहिती देण्यासाठी पुरेसे फलक किंवा तातडीची मदत मिळवण्यासाठी व्यवस्था नसल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. जर वेळेवर मदत मिळाली असती, तर या तरुणाचे प्राण वाचवता आले असते, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com