cricket news kl rahul reveals mother asked get degree lockdown why don t finish 30 papers  Dainik Gomantak
क्रीडा

के.एल राहुलचा खुलासा, 'पदवीचं शिक्षण पूर्ण करण्यासठी आईनं केला होता हट्ट'

तेव्हा मी खूप निराश झालो होतो

दैनिक गोमन्तक

टीम इंडियाचा फलंदाज केएल राहुलने एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, त्याने क्रिकेटर म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली असली तरी लॉकडाऊन दरम्यान त्याची पदवी पूर्ण करण्यासाठी त्याची आई त्याच्या मागे हट्ट करत होती.

29 वर्षीय केएल राहुल सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये लखनौ सुपर जायंट्स (LSG) चे नेतृत्व करत आहे. खेळाच्या तीन फॉरमॅटमध्ये तो भारतीय संघाचा प्रमुख सदस्य आहे.

भारताचा फलंदाज केएल राहुलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, त्याची आई अजूनही पदवी नसल्याबद्दल त्याला ओरडते, शिव्या देते. तसेच लॉकडाऊन असताना ती म्हणायची की, 'तू तुझे पेपर का देत नाहीस... तू घरी बसून आहेस तर अभ्यास करून पदवी का मिळवत नाहीस?' मात्र माझे पालक माझी RBI मध्ये निवड झाल्यावर खूप आनंदी होते.

केएल राहुलने छाप सोडली

विश्वचषक 2019 मध्ये केएल राहुल (KL Rahul) दुखापतींशी झुंज देत असतानाही, भारतीय संघ लीग टप्प्याच्या शेवटी इतर प्रत्येक संघापेक्षा पुढे होता. शिखर धवनचे मनगट फ्रॅक्चर झाल्याने त्याला सुरुवातीचा धक्का बसला आणि त्याला बाहेर पडावे लागले. नंतर विजय शंकरही दुखापतीमुळे बाहेर गेला, त्यानंतर ऋषभ पंतला संधी मिळाली.

धवनच्या दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या केएल राहुलला सलामीला पाठवण्यात आले आणि रोहित शर्माने नऊ सामन्यांमध्ये दोन अर्धशतके आणि एका शतकाच्या मदतीने 361 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT