दुचाकी उत्पादक कंपनी आयकर विभागाच्या जाळ्यात, बोगस व्यवहार आले समोर

26 मार्च 2022 रोजी संपलेल्या तपासानंतर हे प्रकरण आले समोर
Hero MotoCorp made over Rs 1,000 crore bogus expenses, IT search reveals
Hero MotoCorp made over Rs 1,000 crore bogus expenses, IT search revealsDainik Gomantak
Published on
Updated on

भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने ₹ 1,000 कोटींहून अधिक बोगस खर्च केल्याचा आरोप आयकर विभागाने केला आहे. ताज्या अहवालानुसार, कंपनीने दिल्लीच्या छत्तरपूर भागातील फार्महाऊससाठी 100 कोटींहून अधिक बोगस खर्च आणि 1,000 कोटींहून अधिक रोख व्यवहार केले आहेत. एका अहवालात आयकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तपास अजूनही सुरू आहे.

हीरो मोटोकॉर्प लिमिटेड आणि तिचे अध्यक्ष आणि सीईओ (CEO) पवन मुंजाल यांच्यावर 23 मार्च 2022 रोजी आयकर विभागाने दिल्ली-एनसीआरमधील अनेक ठिकाणी शोध आणि जप्तीची कारवाई केल्यानंतर आणि 26 मार्च 2022 रोजी संपलेल्या तपासानंतर हे प्रकरण समोर आले आहे. पवन मुंजाल यांच्या निवासस्थानासह 40 हून अधिक ठिकाणांचा समावेश आहे. हे भारतातील सर्वात मोठ्या दुचाकी निर्मात्याविरुद्धच्या करचुकवेगिरीच्या तपासाचा भाग असल्याचे मानले जाते.

Hero MotoCorp made over Rs 1,000 crore bogus expenses, IT search reveals
लग्न करताय आधी ही बातमी वाचा, अन्यथा उद्भवू शकतात 'या' समस्या

आयकर (Income tax) विभागाने 23 मार्च रोजी हिरो मोटोकॉर्प आणि त्याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पवन मुंजाल यांच्यावर दिल्ली एनसीआरमध्ये अनेक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जी 26 मार्च रोजी संपली. या कारवाईमध्ये दिल्लीतील विविध ठिकाणच्या 40 हून अधिक ठिकाणांचा तपास केला होता.

सूत्रांनी सांगितले की या शोध मोहिमेदरम्यान हार्ड कॉपी दस्तऐवज आणि डिजिटल (Digital) डेटाच्या रूपात मोठ्या प्रमाणात पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या पुराव्यांवरून असे उघड झाले आहे की समूहाने बोगस खरेदी केली आहे, प्रचंड बेहिशेबी रोख खर्च केले आहेत आणि निवास नोंदी मिळवल्या आहेत.

दिल्लीच्या बाहेरील भागात एका फार्म हाऊसच्या खरेदीत 100 कोटींहून अधिक रोख व्यवहार झाल्याचा पुरावाही विभागाला सापडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com