क्रिकेटचे द्रोणाचार्य (Dronacharya of cricket) म्हणून नावाजलेले प्रशिक्षक वासू परांजपे (Vasu Paranjape) यांचे वृध्दापकाळाने निधन झाल्याने क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे. ते 82 वर्षांचे होते. नव्या पिढीला फारसे माहीत नाहीत. फलंदाज असो वा गोलंदाज (Be it a batsman or a bowler), प्रत्येक खेळाडूचा स्वतंत्र अभ्यास करणारे, त्यानुसार त्याला प्रशिक्षण देणारे हे अवलिया नेमके कसे होते, हे समजून घ्यायचे असेल, तर 'क्रिकेट द्रोण' (Cricket Drona) हे पुस्तक वाचलेच पाहिजे. त्यांचे पुत्र जतीन परांजपे व क्रीडा पत्रकार आनंद वासू यांनी हे पुस्तक लिहिले व संपादित केले आहे.
सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड या महान क्रिकेटपटूंची कारकिर्द घडवण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. सुनील गावसकरांना सनी हे टोपननाव परांजपे सरांनीच दिले होते. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि निवड समितीचे सदस्य जतीन परांजपे यांचे ते वडील होते.
मुंबई आणि बडोद्याकडून 29 फर्स्ट क्लास क्रिकेटचे सामने परांजपे यांनी खेळले आहेत. नंतर त्यांनी त्यांचे सर्व आयुष्य क्रिकेट प्रशिक्षणासाठी वेचले. मोठा क्रिकेटपटू ओळखण्याची नजर त्यांच्याकडे होती. त्यांनी राहुल द्रविडला वयाच्या 14 व्या वर्षीच तू भारताकडून खेळशील, पण त्यासाठी विकेटकिंपगपेक्षा बॅटींगवर अधिक फोकस कर, असा सल्ला दिला होता. परांजपे यांचा हा सल्ला द्रविडने मानला. त्यानंतर पुढे जे घडले तो इतिहास आपल्याला महित आहेच. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. भारतीय क्रिकेटचा द्रोणाचार्य हरपला अशी भावना या निमित्ताने व्यक्त होत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.