Crime News  Dainik Gomantak
क्रीडा

Team India Fan: वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या पराभवाचा चाहत्याला धक्का; गळफास घेऊन संपवले जीवन

Cricket Fan Suicide: दरम्यान, टीम इंडियाच्या पराभवाचा क्रिकेट चाहत्याला इतका धक्का बसला की त्याने गळफास लावून आत्महत्या केली.

Manish Jadhav

Team India Fan Committed Suicide in West Bangal: आयसीसी विश्वचषक 2023 चा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. भारतीय क्रिकेट चाहत्यांना 19 नोव्हेंबर 2023 ही तारीख त्यांच्या आठवणींमध्ये अजिबात ठेवायची नाही.

विश्वचषक 2023 मध्ये सलग 10 सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. यातच, पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

दरम्यान, टीम इंडियाच्या (Team India) पराभवाचा क्रिकेट चाहत्याला इतका धक्का बसला की त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पश्चिम बंगालच्या बांकुरा इथे राहणारा 23 वर्षीय राहुल लोहार टीम इंडियाचा मोठा चाहता होता.

रविवारी टीम इंडियाच्या विजयाबद्दल त्याला पूर्ण विश्वास होता, पण पराभवामुळे तो खूप दु:खी झाला होता. नैराश्येतून त्याने रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री उशिरा भाऊ त्याच्या खोलीत गेला असता तो फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

सिनेमा हॉलसमोर फायनल मॅच पाहत होतो

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल साडीच्या दुकानात काम करायचा. रविवारी तो दुकानात गेला नाही. बेलियाटोर येथील सिनेमा हॉलसमोर प्रोजेक्टरवर मित्रांसोबत त्याने सामना पाहिला. सामना संपल्यानंतर तो निराश होऊन घरी परतला. त्याने रात्रीचे जेवणही केले नाही.

रात्री अकराच्या सुमारास राहुलचा लहान भाऊ घरी परतला. त्याला भेटण्यासाठी तो राहुलच्या खोलीत गेला, पण खोलीत प्रवेश करताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली कारण राहुल फासावर लटकलेला दिसला. त्याने तडक कुटुंबीयांना बोलावून राहुलला खाली उतरवून रुग्णालयात (Hospital) नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Betki: सफर गोव्याची! ‘झील सावई, बेतकी आवय’; थंड हवा आणि सुंदर मंदिरांनी सजलेले 'बेतकी'

धोकादायक वळण अन् चालकाची मस्ती! मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 10 जणांची प्रकृती चिंताजनक

"आततायी विकासामुळे आणि बेपर्वाईमुळे झरींची परिस्थिती केविलवाणी झालेली आहे"; गोव्यातले जलस्रोत शेवटच्या घटका मोजत आहेत..

VIDEO: अभिषेक शर्माला राग नडला! मैदानात 'अश्लील शब्द' वापरल्यामुळे 'BCCI'चा मोठा दणका; मॅच फीमध्ये मोठी कपात

VIDEO: वीजांचा गडगडाट! गोव्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; काही ठिकाणी झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT