VIDEO: वीजांचा गडगडाट! गोव्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; काही ठिकाणी झाडे कोसळली

Goa Sattari Rain: सत्तरी तालुक्यात गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक विजेच्या गडगडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली.
Goa Sattari Rain
Goa Sattari RainDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: सत्तरी तालुक्यात गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक विजेच्या गडगडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुमारे अर्धा तास पावसाची सर पडून गेल्यानंतर पुन्हा वातावरण स्वच्छ झाले.

पावसापूर्वी जोरदार वारे वाहत असल्याने वेळूस येथील रवळनाथ मंदिराजवळ रस्त्यावर मोठे झाड कोसळले. तसेच मोर्ले कॉलनी येथील सातेरी मंदिर, घोडेमोळ परिसरात आंब्याचे झाड वीजवाहिनीवर पडल्याने नुकसान झाले.

तसेच मोर्ले-सत्तरी येथे केसरकरवाडा येथे दोन घरांवर आंबाड्याचे झाड पडून सुमारे १० हजारांचे नुकसान झाले तर अग्निशमन दलातर्फे मदतकार्य करत सुमारे ८० हजारांची मालमत्ता वाचविण्यात यश आले आहे. वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावर पडलेली झाडे हटवून वाहतुकीतील अडथळा दूर केला.

Goa Sattari Rain
Goa News: वादळी वाऱ्यामुळे सुपारीचे झाड घरावर कोसळले, सुदैवाने जीवीतहानी टळली; वाचा दिवसभरातील घडामोडी

दरम्यान, डिचोलीत सायंकाळी ४.४५ वा.च्या दरम्यान जोरदार वाऱ्यासह पर्जन्यवृष्टी झाली. पावसामुळे शहरातील बसस्थानक आदी काही भागांत काहीसे पाणी साचले. आयडीसी रस्त्यावर चिखलाची दलदल निर्माण झाली होती.

Goa Sattari Rain
Goa News: नेसई औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात आग; अग्निशमन दलाकडून 10 लाखांची मालमत्ता वाचवली

पावसापूर्वी आगीचा खेळ!

गुरुवारी दुपारी पाऊस पडण्याच्या काही वेळापूर्वी बागवाडा-मोर्ले-सत्तरी येथे गुरुदत्त कामत यांच्या काजू बागायतीला आग लागून सुमारे २० हजारांचे नुकसान झाले. यावेळीही अग्निशमनच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन सुमारे ५० हजारांची मालमत्ता वाचविली. यावेळी जवान अरविंद देसाई, आर. कवठणकर, गंगाराम पावणे, कृष्णा गावकर आदींनी मदतकार्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com