<div class="paragraphs"><p>Cricketer infected with corona</p></div>

Cricketer infected with corona

 

Dainik Gomantak

क्रीडा

BBL वरती कोरोनाचे काळे ढग, ऑस्ट्रेलियाच्या 'या' क्रिकेटरला कोरोनाची लागण

दैनिक गोमन्तक

ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) कोरोनाची (Cricketer infected with corona) बाधा झाली आहे. मॅक्सवेल सध्या BBL (Big Bash League) खेळत होता जिथे तो मेलबर्न स्टार्स संघाचे नेतृत्व करत होता. त्यांच्या टीमने या वृत्ताची माहिती दिली आहे. सोमवारी रात्री मेलबर्न (Glenn Maxwell) रेनेगेड्सविरुद्धच्या सामन्यानंतर त्याची अँटीजन चाचणी करण्यात आली, ज्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याला सध्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून त्याच्या आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

क्लबने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'मॅक्सवेलची अँटीजेन चाचणी मंगळवारी करण्यात आली, जी पॉझिटिव्ह (Positive) आली आहे. आम्ही त्याची आरटीपीसीआर चाचणी केली असून त्याला आयसोलेशनवर पाठवण्यात आले आहे.' मॅक्सवेल हा मेलबर्न स्टार्सचा 13वा खेळाडू आहे ज्याला कोरोनाची लागण झाली आहे. टीममधील 8 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

यापूर्वी, ब्रिस्बेन हीट (Brisbane Heat) संघाच्या खेळाडूंना रॅपिड अँटीजेन (Rapid antigen) चाचणी कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले होते. याच कारणामुळे बीबीएलच्या तीन सामन्यांचे वेळापत्रक शेवटच्या क्षणी बदलावे लागले. बीबीएल संघांमध्ये कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची (Australia) चिंता वाढली आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे इंग्लंड (England) आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) बिग बॅशमध्ये खेळणाऱ्या आपल्या सहा खेळाडूंना ऑस्ट्रेलियातून परतण्याचे आदेश दिले होते. बीबीएलमध्ये खेळणाऱ्या इंग्लंडच्या सहा खेळाडूंना राष्ट्रीय संघाच्या वेस्ट इंडिज दौर्‍यापूर्वी वेगळे होण्यासाठी लवकर घरी जाण्यास सांगण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT