फास्ट बॉलर इबादत हुसेनने बांगलादेशसाठी ते काम केले, ज्याची कदाचित कोणत्याही क्रिकेटप्रेमीला अपेक्षा नसेल. इबादत हुसेनने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या डावात 6 विकेट घेतले आणि या जोरावर त्याने बांगलादेशच्या (Bangladesh) कसोटी क्रिकेटमधील (Cricket) ऐतिहासिक विजयाचा पाया रचला. नंतर 8 विकेट्सने बांगलादेशने न्यूझीलंड (New Zealand) संघाविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला.
बांगलादेश क्रिकेट संघाला 2000 च्या सुरुवातीला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला होता, परंतु त्यानंतर बांगलादेशला न्यूझीलंडवर कधीही विजय मिळवता आलेला नाही. गेल्या 20 वर्षांत दोन्ही देशांदरम्यान 15 सामने झाले, ज्यामध्ये 12 सामने बांगलादेशने गमावले, तर तीन सामने अनिर्णित राहिले. त्याचबरोबर बांगलादेशने 2022 ची सुरुवात दमदारपणे केली आणि 2017 पासून अजिंक्य किवी संघाचा त्यांच्या भूमीवर पराभव केला.
या सामन्यात यजमान न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 गडी गमावून 328 धावा केल्या. त्यानंतर बांगलादेशने पहिल्या डावात 458 धावा करत 130 धावांची आघाडी घेतली. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात इबादत हुसेनने बरेच काही दाखवून दिले आणि सामन्याच्या चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाची धावसंख्या पाच बाद 147 अशी होती, त्यात त्याने चार विकेट घेतल्या.
त्याचवेळी शेवटच्या दिवशी इबादत हुसेनने आणखी दोन फलंदाजांना पायचीत केले. अशा प्रकारे त्याने दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेतल्या. त्याचवेळी न्यूझीलंडच्या संघाला दुसऱ्या डावात 169 धावा करता आल्या. अशा स्थितीत बांगलादेशला विजयासाठी केवळ 40 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे बांगलादेश संघाने 2 गडी गमावून पूर्ण केले. बांगलादेशने मागील तीन फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडमध्ये खेळलेल्या 34 सामन्यांपैकी फक्त एक सामना (स्कॉटलंडविरुद्ध) जिंकला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.