Under 17 Womens Football World Cup Dainik Gomantak
क्रीडा

Under 17 Womens Football World Cup: जर्मनीसमोर चिलीचा धोका

ब गटात अव्वल स्थानासाठी चुरस

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : दक्षिण अमेरिकन संघ चिलीची फिफा १७ वर्षांखालील महिला विश्वकरंडक स्पर्धेतील सुरवात दणकेबाज ठरली. अनुभवी न्यूझीलंडला चकीत केल्यानंतर आता जर्मनीसमोर त्यांचा धोका असेल. ब गटातील अव्वल स्थानासाठी ही लढत महत्त्वाची ठरू शकते. (Under 17 Womens Football World Cup)

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शुक्रवारी (ता. १४) होणाऱ्या लढतीत चिलीचा संघ अंडरडॉग्ज असेल, त्यामुळे जर्मनीला सावध राहावे लागेल. गटातील पहिल्या लढतीत पिछाडीवरून नायजेरियाला नमविताना जर्मनीला संघर्ष करावा लागला होता.

ब गटातील आणखी एका लढतीत न्यूझीलंड व नायजेरिया संघ बाद फेरीतील जागेसाठी आव्हान कायम राखण्याच्या प्रयत्नात असतील.

चिलीने ४-३-३ व्यूहरचनेत खेळताना पूर्वार्धातील अर्ध्या तासाच्या खेळापूर्वी दोन गोल करत न्यूझीलंडच्या आव्हानातील हवा काढून घेतली होती. अॅलेक्स कास्ट्रो यांच्या मार्गदर्शनाखालील हा संघ विश्वकरंडक स्पर्धेत दुसऱ्यांदाच खेळत आहे. १२ वर्षांपूर्वी सर्वप्रथम या स्पर्धेत खेळताना त्यांना तीनही सामने गमवावे लागले होते व फक्त एकच गोल केला होता.

यंदा पहिल्याच लढतीत आक्रमक खेळाचे शानदार प्रदर्शन घडविताना चिलीने प्रतिस्पर्ध्यांवर तीन गोल डागले. चौदा वर्षीय अँबर फिगेरोआ याने शानदार पहिला गोल केला होता.

जर्मनीची ही सातवी विश्वकरंडक स्पर्धा आहे. फ्रेडेरिके क्रोम्प यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने मागील लढतीत उत्तरार्धात दोन गोल नोंदवत नायजेरियाचा प्रतिकार मागे सारला होता.

फातोर्ड्यातील आजचे सामने (ब गट)

1) न्यूझीलंड विरुद्ध नायजेरिया (संध्याकाळी ४.३० वाजता)

2) जर्मनी विरुद्ध चिली (रात्री ८ वाजता)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: मुख्यमंत्र्य‍ांनी सभापतींना डोळे मारणे बंद करावे!

Bangkok Shooting: कंबोडियासोबत युद्ध सुरु असतानाच थायलंडच्या बँकॉकमध्ये गोळीबार; 6 जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वतःलाही संपवलं Watch Video

Asia Cup 2025: आशिया कपपूर्वी मोठी घोषणा! 13 हजार धावा करणारा दिग्गज बनला मुख्य प्रशिक्षक

Goa Education: ABC म्हणजे 'रोमन कोकणी' नव्हे, देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करण्यास सरकार देणार मदत; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

'किमान मुख्यमंत्री, आमदाराला फोन करुन चौकशी करा, कोणालाही पैसे पाठवू नका'; मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

SCROLL FOR NEXT