BCCI सोडल्यानंतर दादाची पहिली प्रतिक्रीया, वक्तव्याने सर्वांनाच केले आश्चर्यचकित

Sourav Ganguly: भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने बीसीसीआय सोडल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली आहे.
Sourav Ganguly
Sourav Ganguly Dainik Gomantak
Published on
Updated on

Sourav Ganguly Statement: भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने बीसीसीआय सोडल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली आहे. गांगुलीच्या या ताज्या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन पायउतार झाला आहे. बीसीसीआयमध्ये गांगुलीला कोणताही पाठिंबा मिळाला नाही आणि त्याचा कार्यकाळ 'निराशाजनक' पातळीवर संपला.

बीसीसीआयमधून बाहेर पडल्यानंतर गांगुली म्हणाला

बीसीसीआय (BCCI) सोडल्यानंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) पहिल्यांदाच मीडियासमोर आला. यावेळी बोलताना सौरव गांगुली म्हणाला की, 'मी पाच वर्षे क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचा (CAB) अध्यक्ष होतो. त्यानंतर मी तीन वर्षे बीसीसीआयचा अध्यक्ष राहीलो. या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून तुम्हाला जावं लागतं. एक क्रिकेटपटू म्हणून तुमच्यासमोर अनेक मोठी आव्हाने असतात. तसेच, मी एक प्रशासक म्हणूनही सेवा देऊ शकलो.'

Sourav Ganguly
Sourav Ganguly News: सौरव गांगुलीने राजीनाम्याच्या मुद्यावर सोडले मौन

त्यांच्या या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला

सौरव गांगुली पुढे म्हणाला की, 'तुम्हाला संघासाठी मेहनत घ्यावी लागते. एक खेळाडू म्हणून मी बराच काळ खेळलो, याचा मला खूप आनंद आहे. तसेच, एक प्रशासक म्हणून मी काही संस्मरणीय आणि उत्कृष्ट क्षणांचा एक भाग बनू शकलो. तुम्ही कायम खेळू शकत नाही आणि तुम्ही कायमचे प्रशासकही होऊ शकत नाही.' सौरव गांगुलीच्या या विधानात वेदना आणि निराशा स्पष्टपणे दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com