Purvaja Varlekar Dainik Gomantak
क्रीडा

Chhattisgarh Women’s T20 Cup 2023: गोव्याच्या महिलांची विजयी आगेकूच; छत्तीसगड रेड संघावर आठ विकेट राखून मात

छत्तीसगड रेड संघाने नाणेफेक जिंकली व प्रथम फलंदाजी स्वीकारली

किशोर पेटकर

Chhattisgarh Women’s T20 Cup 2023: गोलंदाजांनी धारदार मार करत यजमान छत्तीसगड रेड महिला संघाला ऐंशी धावांत गुंडाळल्यानंतर गोव्याने सामना आठ विकेट राखून जिंकला आणि छत्तीसगड महिला टी-२० कप निमंत्रित संघांच्या सीनियर क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

विजयी लक्ष्य १४.१ षटकांत फक्त दोन विकेट गमावून गाठताना फलंदाजीतही प्रभाव पाडला. सामना सोमवारी छत्तीसगडमधील रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाला.

छत्तीसगड रेड संघाने नाणेफेक जिंकली व प्रथम फलंदाजी स्वीकारली. गोव्याच्या साऱ्याच गोलंदाजांनी छान मारा करत छत्तीसगड रेड संघाला ७ बाद ७८ असे रोखले. नंतर डावातील अखेरच्या षटकात तनया नाईक हिने तीन विकेट टिपत प्रतिस्पर्धांचा डाव ८० धावांत गुंडाळला.

पूर्वजा वेर्लेकर हिच्या ३८ चेंडूंतील नाबाद ३९ धावांच्या बळावर गोव्याच्या महिलांनी सामना लीलया जिंकला. पूर्वजाने चार चौकार व एक षटकारही मारला. सुनंदा येत्रेकर (१९) व कर्णधार संजुला नाईक (नाबाद १८) यांनीही चांगली फलंदाजी केली.

संक्षिप्त धावफलक

छत्तीसगड रेड महिला : २० षटकांत सर्वबाद ८० (संजना पारदी १९, शिवानी कृष्णा २०, शिखा पांडे ३-०-२०-१, पूर्वा भाईडकर ४-०-१६-१, प्रियांका कौशल ४-०-१२-१, दीक्षा गावडे ४-०-१४-१, तरन्नूम पठाण ४-०-१५-०, तनया नाईक १-१-०-३) पराभूत

वि. गोवा महिला: १४.१ षटकांत २ बाद ८१ (पूर्वजा वेर्लेकर नाबाद ३९, तरन्नूम पठाण ०, सुनंदा येत्रेकर १९, संजुला नाईक नाबाद १८, प्रतिज्ञा सिंग ३-०-१८-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT