Cheteshwar Pujara Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN, 2nd Test: 16 धावा करताच पुजाराची खास विक्रमाला गवसणी; चक्क ब्रॅडमन यांना टाकलंय मागे

बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटीत खेळताना पुजाराने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

Cheteshwar Pujara: बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात ढाक्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्यादरम्यान भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

शुक्रवारी म्हणजेच या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार केएल राहुल बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी उतरला होता. त्याने यावेळी 16 धावा करताच कसोटीमध्ये 7000 धावांचा टप्पा पूर्ण केला.

(Cheteshwar Pujara completes 7000 test runs)

त्यामुळे तो 7000 धावा करणारा जगातील 55 वा आणि भारताचा 8 वा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारताकडून सचिन तेंडुलकर (15921), राहुल द्रविड (13265), सुनील गावसकर (13265), व्हीव्हीएस लक्ष्मण (8781), विरेंद्र सेहवाग (8503), विराट कोहली (8111) आणि सौरव गांगुलीने (7212) कसोटीमध्ये 7000 धावांचा टप्पा पार केला आहे.

तसेच पुजाराने या 7000 धावा 167 व्या कसोटी डावात खेळताना पूर्ण केल्या. त्यामुळे तो सर्वात जलद 7000 कसोटी धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सहाव्या क्रमांकावरही आला आहे.

सर्वात कमी डावात कसोटीत 7000 धावा करणारे भारतीय फलंदाज -

134 - विरेंद्र सेहवाग

136 - सचिन तेंडुलकर

138 - विराट कोहली

140 - सुनील गावसकर

141 - राहुल द्रविड

167 - चेतेश्वर पुजारा

181 - व्हीव्हीएस लक्ष्मण

ब्रॅडमन यांना टाकले मागे

पुजाराने शुक्रवारी चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी खेळी करू शकला नाही. तो 24 धावांवर बाद झाला. त्यामुळे त्याच्या आता 167 डावात 7008 धावा झाल्या आहेत. त्यामुळे कसोटी सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये तो 55 व्या क्रमांकावर आला असल्याने महान फलंदाज डॉन ब्रॅडमन 56 व्या क्रमांकावर घसरले आहेत. ब्रॅडमन यांनी त्यांच्या कारकिर्दीत 6996 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा निवृत्त होणार? BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्लांनी अफवांवर दिलं स्पष्ट उत्तर; 'हिटमॅन'बाबतचा संभ्रम दूर

Sonia Gandhi on Students Protest: 'विद्यार्थ्यांना शत्रू मानतं मोदी सरकार'! 'नीट' पेपरफुटीवरुन सोनिया गांधींचा हल्लाबोल

Pakistan Suicide Attack: पाकिस्तान पुन्हा रक्ताळला! खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 12 सैनिकांसह 15 जण ठार 

Horoscope: एकादशीचा शुभ मुहूर्त! 'या' राशींचे नशीब उजळणार; आर्थिक लाभासह करिअरमध्ये यशाचे संकेत

Goa Youth Protest: परवानगी नाकारली; निदर्शने केलीच, म्हापशातील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा

SCROLL FOR NEXT