IND vs BAN, 2nd Test: पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजी चमकली; उमेश-अश्विनने घेतल्या 8 विकेट्स

बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली आहे.
Team India
Team India Dainik Gomantak
Published on
Updated on

IND vs BAN, 2nd Test: बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना ढाक्यातील शेर बांगला नॅशनल स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात गुरुवारी पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात बिनबाद 19 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी बांगलादेशने पहिल्या डावात सर्वबाद 227 धावा केल्या आहेत.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशनी फलंदाजीची सुरुवातही चांगली केली होती. मात्र, चांगल्या सुरुवातीचा फायदा त्यांना घेता आला नाही. तब्बल 12 वर्षांनी संधी मिळालेल्या जयदेव उनाडकटने झाकिर हसनला 15 धावांवर बाद करत बांगलादेशची सलामी जोडी फोडली.

Team India
IND vs BAN: तब्बल 12 वर्षांनंतरचे कमबॅक ठरले विक्रमी! मैदानात उतरताच उनाडकटच्या नावावर खास रेकॉर्ड

त्याच्या पुढच्याच षटकात आर अश्विनने नजमुल शांतोला 24 धावांवर बाद करत बांगलादेशला दुसरा धक्का दिला. पण, त्यांनतर मोमिनुल हक आणि कर्णधार शाकिब अल हसनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यात 43 धावांची भागीदारी झाली असताना शाकिबला दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच 16 धावांवर उमेश यादवने बाद केले.

त्यानंतर मोमिनुल हकला मुशफिकूर रहिम, लिटन दास, मेहदी हसन मिराज यांनी चांगली साथ देण्याचा प्रयत्न केलेला. मात्र हे तिघेही खेळपट्टीवर स्थिरावल्यावर बाद झाले. मोमिनुल हकने एक बाजू सांभाळली होती. पण त्यालाही अश्विनने 84 धावांवर बाद करत बांगलादेशला मोठा धक्का दिला.

Team India
IND vs BAN: कशी नशिबाने थट्टा मांडली! पहिल्या कसोटीचा 'हिरो' ढाका कसोटीत ड्रॉप, केएल राहुल म्हणतोय...

मोमिनुलने 157 चेंडूत ही खेळी करताना 12 चौकार आणि 1 षटकार मारला. अखेर खालेद अहमदलाही बाद करत अश्विनने बांगलादेशचा पहिला डाव 73.5 षटकांत 227 धावांवर संपुष्टात आणला. भारताकडून आर अश्विन आणि उमेश यादवने प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या, तसेच जयदेव उनाडकटने 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर भारतीय संघाकडून शुबमन गिल आणि कर्णधार केएल राहुल सलामीला फलंदाजीला उतरले. त्यांनी पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विकेट गमावू दिली नाही. पहिल्या दिवसाखेर गिल 14 आणि केएल राहुल 3 धावांवर नाबाद राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com