GCA Premier League Cricket | Abhinav Tej Rana Dainik Gomantak
क्रीडा

GCA Premier League: धेंपो क्लबसमोर 'एमसीसी'चे आव्हान; विजेतेपदासाठी भिडणार

पणजी जिमखाना, साळगावकर क्लब उपांत्य फेरीत गारद

किशोर पेटकर

GCA Premier League Cricket: मडगाव क्रिकेट क्लबने (एमसीसी) साळगावकर क्रिकेट क्लबवर सात विकेटने विजय नोंदवून धडाक्यात गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. विजेतेपदासाठी त्यांच्यासमोर आता धेंपो क्रिकेट क्लबचे आव्हान असेल.

धेंपो क्लबने अनिर्णित लढतीत पणजी जिमखान्यावर पहिल्या डावात घेतलेल्या 194 धावांच्या आघाडीमुळे आगेकूच राखली. बुधवारी सामन्याच्या शेवटच्या दिवशी धेंपो क्लबच्या दुसऱ्या डावात अभिनव तेज राणा याचे आक्रमक शतक लक्षवेधी ठरले.

त्याने 112 चेंडूंत 11 चौकार व 9 षटकारांच्या मदतीने तडाखेबंद 144 धावा केल्या. साळगावकरविरुद्ध पहिल्या डावात 138 धावांचे आघाडी घेतलेल्या एमसीसीने दुसऱ्या डावात 132 धावांचे विजयी लक्ष्य 3 विकेट गमावून 34.5 षटकांत गाठले.

संक्षिप्त धावफलक

पर्वरी येथे ः

धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव ः 402 व दुसरा डाव ः 51 षटकांत 8 बाद 274 (करण वस्सोदिया 56, अभिनव तेज राणा 144, हेरंब परब (फिरकी) 5-113, राहुल मेहता 2-76) अनिर्णित विरुद्ध पणजी जिमखाना, पहिला डाव ः 208.

कांपाल-पणजी येथे ः

साळगावकर क्रिकेट क्लब, पहिला डाव ः 207 व दुसरा डाव ः 54.4 षटकांत 8 बाद 269 घोषित (अमोघ देसाई 62, गौरीश कांबळी 42, आदित्य सूर्यवंशी 63, यश कसवणकर 31, हेरंब परब (वेगवान) 3-71, दर्शन मिसाळ 2-106, कीथ पिंटो 2-55, वेदांत नाईक 1-21) पराभूत वि. मडगाव क्रिकेट क्लब, पहिला डाव ः 345 व दुसरा डाव ः 34.5 षटकांत 3 बाद 133 (सुमीरन आमोणकर नाबाद 56, प्रथमेश गावस 22, वेदांत नाईक नाबाद 20, यश कसवणकर 2-28).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Unseasonal Rain: गुढीपाडव्याला वरुणराजा लावणार हजेरी! गोव्यात 18, 19 मार्चला 'यलो अलर्ट'; विजांच्या कडकडासह बरसणार सरी

Konkan Railway: 'कोकण रेल्वे' मार्गावर मान्सूनपूर्व तपासणी! मडगाव-ठोकूर, मडगाव-रोहा मार्गावर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! पगारात होणार 35 टक्क्यांची बंपर वाढ?8व्या वेतन आयोगाबाबत अर्थ मंत्रालयाने मागवल्या सूचना

Canacona: काणकोणात वाढती ‘ड्रग्स’ची तस्करी! पाळोळे, आगोंद परिसर विळख्यात; विद्यार्थी, पालकांसाठी धोक्याची घंटा

"हा खरा गोवा होता जो मला कधी दिसलाच नव्हता"! ‘गोंयकार’पण जपायचे आहे तर डोळ्यात अंगार हवा, मनात निर्धार हवा...

SCROLL FOR NEXT