IPL New Rule: काय सांगता! टॉसनंतर कॅप्टन घोषित करणार प्लेइंग-11, नक्की काय आहेत नियम?

आयपीएल 2023 मध्ये इम्पॅक्ट प्लेअर बरोबरच आणखी एक नवीन नियम लागू केला जाणार आहे, ज्यामध्ये टॉसनंतर कर्णधार आपली प्लेइंग इलेव्हन सांगू शकतात.
IPL 2023
IPL 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Indian Premier League New Rules: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेला आता दोन आठवड्यांपेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. हा आयपीएलचा 16 वा हंगाम असून 31 मार्चला गतविजेता गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याने या हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आयपीएलच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अशातच यंदा एक नवीन नियम देखील वापरात आलेला पाहायला मिळणार आहे

आयपीएल 2023 मध्ये आता नाणेफेकीवेळी कर्णधार दोन वेगवेगळ्या प्लेइंग इलेव्हनच्या शीट्स बरोबर घेऊन येऊ शकतात. तसेच नाणेफेक झाल्यानंतर नाणेफेकीच्या निकालानुसार कोणती प्लेइंग इलेव्हन खेळवायची याचा निर्णय घेऊन ती शिट सामनाधिकाऱ्यांकडे सुपूर्त करू शकतात.

साधारणत: क्रिकेटमध्ये सामना खेळणाऱ्या दोन्ही संघांच्या कर्णधारांना नाणेफेकीला आल्यानंतर नाणेफेक होण्यापूर्वी प्लेइंग इलेव्हनची शीट सुपूर्त करावी लागते. पण आता आयपीएलमध्ये हा नियम बदलण्यात आला आहे.

IPL 2023
Shreyas Iyer: सर्जरी नक्की? IPL ला तर मुकणारच, पण 'ही' ICC स्पर्धा खेळणेही कठीण

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार नाणेफेक झाल्यानंतर संघ प्रथम फलंदाजी की गोलंदाजी करणार आहेत यावर अवलंबून सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडू शकतात. यामध्ये संघांना इम्पॅक्ट खेळाडूचे नावही द्यावे लागणार आहे. दरम्यान हा नियम इम्पॅक्ट खेळाडू निवडण्यासाठीही महत्त्वाचा ठरू शकतो.

यंदा आयपीएलमध्ये इम्पॅक्ट खेळाडूचाही समावेश करण्यात आला आहे. इम्पॅक्ट प्लेअर हा संघाचा 12 वा खेळाडू असेल जो गरजेनुसार फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्यासाठी प्लेइंग इलेव्हनमधील एखाद्या खेळाडू ऐवजी बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरू शकतो.

आयपीएलपूर्वी दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्ये नाणेफेकीनंतर कर्णधारांना प्लेइंग इलेव्हन घोषित करण्याची परवानगी दिली होती. दरम्यान, दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्ये या नियमानंतर सामन्यांचे निकाल जवळपास समान लागले. म्हणजेच नाणेफेक जिंकणारा संघ 15 वेळा आणि नाणेफेक हरणारा संघ 16 वेळा सामना जिंकला.

IPL 2023
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचे 'मिचेल' फॅक्टर भारतावर भारी! दुसऱ्या वनडेतील पराभवाची 3 कारणे

हीच विचारप्रक्रिया स्विकारून आयपीएलमध्येही हा नियम लागू केला असण्याची शक्यता आहे. कारण भारतात बऱ्याचदा दवाचा परिणाम आढळतो. अशा परिस्थितीत या नियमामुळे दोन्ही संघांना सामन्यात समान संधी मिळू शकते. आता हा नियम प्रत्यक्षात आयपीएलमध्ये कसा परिणाम करणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे देखील नियम

याशिवाय यंदाच्या आयपीएलमध्ये संघांनी निर्धारित वेळत षटके टाकली नाहीत, तर उशीराने टाकलेल्या प्रत्येक षटकासाठी संघांना कारवाई म्हणून केवळ चारच क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवता येणार आहेत.

तसेच यष्टीरक्षकाकडून किंवा क्षेत्ररक्षकाकडून चूकीचे वर्तन झाल्यास तो चेंडू डेड बॉल घोषित केला जाईल, तसेच 5 पेनल्टी धावा दिल्या जातील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com