Hardik Pandya | Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

Hardik Pandya: 'चूक माझीच की मी...', हार्दिकने सांगितले विंडिजविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाचे कारण

India vs West Indies: वेस्ट इंडिजविरुद्ध पाचव्या टी20 सामन्यात भारताच्या पराभवासाठी कर्णधार हार्दिकने स्वत:लाच जबाबदार धरले आहे.

Pranali Kodre

Hardik Pandya on India's T20I Series Defeat Against West Indies:

वेस्ट इंडिज संघाने भारताविरुद्ध रविवारी (13 ऑगस्ट) पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला. य विजयासह वेस्ट इंडिजने टी20 मालिका 3-2 फरकाने जिंकली. दरम्यान, या सामन्यानंतर भारताचा कर्णधार हार्दिक पंड्याने चूक मान्य केली आहे.

पाचव्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजसमोर 166 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग वेस्ट इंडिजने 18 षटकात 2 विकेट्स गमावत 171 धावा करत सहज पूर्ण केला आणि सामना जिंकला.

या सामन्यानंतर प्रेझेंटेशनमध्ये हार्दिकने त्याची फलंदाजीतील चूक मान्य केली. तो भारताने 66 धावात ३ विकेट्स गमावल्यानंतर फलंदाजीला आला होता. यावेळी दुसऱ्या बाजूने सूर्यकुमार आक्रमक खेळत होता. पण हार्दिकला 18 चेंडूत केवळ 14 धावाच करता आल्या.

याबद्दल तो सामन्यानंतर म्हणाला, 'जर तुम्ही पाहिले, तर आम्ही 10 षटकांनंतरच्या कालावधीत पराभूत झालो. मी फलंदाजीला आलो, माझा वेळ घेतला आणि नंतर मी त्याचा फायदा घेऊ शकलो नाही. मला वाटते की खेळाडू चांगले खेळले, पण मी त्यावेळेत चांगला खेळ करण्यात अपयशी ठरलो.'

हार्दिक पुढे म्हणाला, 'हे असे सामने आहेत, जिथे तुम्ही स्वत:ला आव्हान देऊ शकता. एकंदरीत, एखादी मालिका हरणे ठिक आहे. ही मोठी प्रक्रिया आहे, ज्याचे स्पष्टीकरण देण्याची मला गरज वाटत नाही. खेळाडू स्वत:मध्ये सुधारणा करत आहेत आणि मला वाटते सध्या सर्व चांगले सुरू आहे.'

आगामी 2024 टी20 वर्ल्डकपबाबत बोलताना हार्दिक म्हणाला, 'मला वाटते त्यासाठी अजून बराच वेळ आहे. पुढील आव्हान हे वनडे वर्ल्डकपचे आहे. कधीकधी पराभूत होणे चांगले असते. त्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकण्यास मिळतात. त्यामुळे चूका झाकल्या जात नाहीत.'

दरम्यान, भारताने दिलेल्या 166 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने काईल मेयर्सची विकेट दुसऱ्याच षटकात गमावली होती. पण त्यानंतर ब्रेंडन किंग आणि निकोलस पूरन यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी झालेल्या 107 धावांच्या शतकी भागीदारीही महत्त्वाची ठरली.

पूरनने 47 धावांची खेळी केली, तर ब्रेंडन किंगने नाबाद 85 धावा केल्या आणि वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला.

तत्पुर्वी, भारताने सूर्यकुमार यादवच्या 61 धावांच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 165 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजकडून रोमारियो शेफर्डने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT