पर्वरी ः गोव्याच्या २३ वर्षांखालील क्रिकेट संघासमवेत गोवा क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार दया पागी, सीनियर क्रिकेट संचालक प्रकाश मयेकर व मान्यवर. Dainik Gomantak
क्रीडा

C. K. Nayudu Trophy: राहुल मेहता याच्याकडे गोव्याचे कर्णधारपद; रणजी संघ इच्छुकांना संधी

गोव्याचा १५ सदस्यीय संघ जाहीर

किशोर पेटकर

C. K. Nayudu Trophy: रणजी करंडक क्रिकेट संघात दाखल होण्यासाठी महत्त्वाची पायरी असलेल्या २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेतील गोव्याची मोहीम सात जानेवारीपासून सुरू होईल. वरिष्ठ संघात स्थान मिळवून इच्छिणाऱ्या नवोदितांसाठी स्पर्धा महत्त्वाची असेल.

आंध्रविरुद्ध सातपासून कडापा येथे होणाऱ्या आणि छत्तीसगडविरुद्ध १४ जानेवारीपासून भिलाई येथे होणाऱ्या दोन्ही चार दिवसीय सामन्यांसाठी गोव्याचा १५ सदस्यीय संघ बुधवारी जाहीर करण्यात आला. अष्टपैलू राहुल मेहता संघाचा कर्णधार असून वेगवान गोलंदाज शुभम तारी उपकर्णधार आहे.

स्पर्धेत गोव्याच्या ‘ड’ गटात आंध्र व छत्तीसगड या संघांव्यतिरिक्त केरळ, तमिळनाडू, रेल्वे व राजस्थान हे संघ आहेत. गोव्याचा संघ केरळ, तमिळनाडू व राजस्थानविरुद्धचे सामने घरच्या मैदानावर खेळेल.

वेगवान शुभम तारीकडे लक्ष

२२ वर्षीय वेगवान गोलंदाज शुभम तारी याच्या कामगिरीकडे सीनियर निवड समितीचे लक्ष असेल. ऑक्टोबर २०२३ सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील पदार्पण त्याने संस्मरणीय ठरविले. ७ सामन्यांत त्याने १५.०७च्या सरासरीने १३ गडी बाद करून छाप पाडली.

नंतर तो विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील एक सामना खेळला. मात्र रणजी करंडक क्रिकेट संघ निवडीत शुभम १५ सदस्यीय संघात जागा मिळवू शकला नाही. या संघात प्रवेश करण्यासाठी त्याला २३ वर्षांखालील स्पर्धेतील कामगिरी महत्त्वाची असेल.

दोन सामन्यांसाठी गोव्याचा संघ

राहुल मेहता (कर्णधार), योगेश कवठणकर, थोटा महंमद अझान, कौशल हट्टंगडी, अभिनव तेजराणा, शिवेंद्र भुजबळ, आयुष वेर्लेकर, दीप कसवणकर, मनीष पै काकोडे, पियुष यादव, जगदीश पाटील, शुभम तारी (उपकर्णधार), फरदिन खान, लकमेश पावणे, मयूर कानडे.

स्पर्धेतील गोव्याचे वेळापत्रक

विरुद्ध आंध्र (७ जानेवारीपासून, कडापा), विरुद्ध छत्तीसगड (१४ जानेवारीपासून, भिलाई), विरुद्ध केरळ (२१ जानेवारीपासून, सांगे), विरुद्ध तमिळनाडू (४ फेब्रुवारीपासून, सांगे), विरुद्ध रेल्वे (११ फेब्रुवारीपासून, राजकोट), विरुद्ध राजस्थान (१८ फेब्रुवारीपासून, सांगे).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT