गोव्यातील कन्स्ट्रक्शन कंपनीचे 17 कोटी रूपये स्वतःच्या खात्यात केले ट्रान्सफर; फोन स्विच ऑफ करून झाला फरार...

अकाऊंट विभागातील कर्मचाऱ्याचे कृत्य; मूळचा उत्तर प्रदेशचा
Goa Employee transferred 17 crore from company ac to his own ac
Goa Employee transferred 17 crore from company ac to his own ac Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime: गोव्यातील एका कन्स्ट्रक्शन कंपनीत अकाऊंट विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने कंपनीची तब्बल 17 कोटींची फसवणूक केली आहे. कंपनीतील सर्वांचा त्याच्यावर विश्वास होता.

याचा गैरफायदा घेत त्याने कंपनीचे 17 कोटी रूपये स्वतःच्या शेअर मार्केटच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले होते. दरम्यान, त्याचा हा डाव उघड झाला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

अशोककुमार ओरियम मौर्य असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो गोव्यात सांता क्रुझ भागात वास्तव्यास होता, पण तो मूळचा बशरतपूर, शाहपूर, जि. गोरखपूर, उत्तर प्रदेश येथील आहे.

(Employee of construction company from Goa transferred 17 crore from company ac to his own ac )

Goa Employee transferred 17 crore from company ac to his own ac
Goa Cyber Crime: गोव्यातील मुलीची 8.50 लाख रूपयांची फसवणूक; आधी ऑनलाईन फ्रेंडशिप, मग लग्नाचे आमिष...

अशोककुमार हा गोव्यातील आदिती कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अकाऊंट विभागाच्या कार्यालयात काम करत होता. तो अनेक वर्षांपासून कंपनीत काम करत होता, असे कळते. त्यामुळेच त्याच्यावर सर्वांचा विश्वास निर्माण झाला होता. कुणालाही त्याचे वर्तन अविश्वासू वाटले नाही.

याच विश्वासाचा गैरफायदा घेत अशोककुमार याने हुशारीने कंपनीचे 17 कोटी रूपये स्वतःच्या शेअर मार्केट अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले. त्यानंतर स्वतःचे आणि कुटूंबियांचे मोबाईल फोन नंबर स्विच ऑफ करून तो फरार झाला होता.

29 डिसेंबर रोजी गोवा पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस त्याच्या मागावर असताना तो उत्तराखंडमध्ये असल्याचे कळाले. गोवा पोलिसांनी ही माहिती उत्तराखंड पोलिस आणि तेथील स्पेशल टास्क फोर्सला दिली.

Goa Employee transferred 17 crore from company ac to his own ac
Kerala Girl Molestation: रेल्वेतून गोव्याला येत असलेल्या केरळच्या पर्यटक महिलेचा विनयभंग

त्यानंतर स्पेशल टास्क फोर्सने तातडीने पावले उचलत उत्तराखंडमधील सेवला खुर्द येथील राजराणी वेडिंग पॉईंट येथून त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, गोवा पोलिसांचे पथक तिथे दाखल झाल्यावर आरोपीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

गोवा पोलिसांनी त्याचा ताबा घेतला आहे. आता गोवा पोलिस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com