Ashleigh Gardner Dainik Gomantak
क्रीडा

ICC Womens ODI Rankings: आयसीसी वनडे रॅंकिंगमध्ये ऍशले गार्डनरचा जलवा, तिन्ही लिस्टमध्ये मोठी झेप

Ashleigh Gardner: गोलंदाजांच्या क्रमवारीत ऍशले गार्डनर एका स्थानाने प्रगती करत चौथ्या स्थानावर पोहोचली. तर अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.

Manish Jadhav

Ashleigh Gardner, ICC Womens ODI Rankings: आयसीसीने (ICC) ने मंगळवार, 1 ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या महिला एकदिवसीय क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या ऍशले गार्डनरने मोठी झेप घेतली. आयर्लंडविरुद्धच्या तूफानी खेळीचा तिला या क्रमवारीत फायदा झाला.

ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली

दरम्यान, गोलंदाजांच्या क्रमवारीत ऍशले गार्डनर एका स्थानाने प्रगती करत चौथ्या स्थानावर पोहोचली. तर अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.

याशिवाय, ऍशलेने पाच स्थानांची झेप घेत आयसीसी महिला एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत 16व्या स्थानावर पोहोचली आहे. तिच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने (Australia) तीन सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली.

या खेळाडूंच्या क्रमवारीतही सुधारणा

तसेच, फलंदाजीच्या क्रमवारीत अॅनाबेल सदरलँड 16 व्या स्थानावर तर फोबी लिचफिल्ड 51 व्या स्थानावर पोहचली. अॅनाबेल सदरलँडने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाबाद 109 तर फोबी लिचफिल्डने नाबाद 106 धावा केल्या.

दोघींनी पहिल्या विकेटसाठी 215 धावांची पाटर्नरशिप केली. दरम्यान, जॉर्जिया वेअरहॅमने 12 स्थानांची प्रगती करत 66 व्या स्थानावर पोहोचली आहे.

ब्राऊनने शानदार 4 विकेट घेतल्या

त्याचबरोबर, अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत वेअरहॅम 8 व्या स्थानावरुन 22 व्या स्थानावर तर सदरलँड 9 व्या स्थानावरुन 25 व्या स्थानावर पोहोचली आहे. गोलंदाजांमध्ये डार्सी ब्राउन चार स्थानांनी 35व्या तर किम गर्थने 15 स्थानांनी प्रगती करत 56व्या स्थानावर पोहोचली आहे. ब्राऊनने दोन सामन्यांत चार विकेट घेतल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मुंबई इंडियन्सने शेअर केला चिमुकल्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचा व्हिडिओ, फॅन्स म्हणाले, "म्हणूनच हा संघ आमच्यासाठी खास..."

Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

Gujarat Violence: धार्मिक कार्यक्रमावरून गुजरातमध्ये हिंसाचार; घरांची तोडफोड, 30 वाहने जाळली, 10 जखमी

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

SCROLL FOR NEXT