ICC latest ODI Ranking: कोहली-रोहित नव्हे, 'या' धाकड फलंदाजाचा वनडे क्रिकेटमध्ये जलवा; रचला नवा इतिहास
ICC latest ODI Ranking: सध्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक स्टार फलंदाज आपल्या बॅटने कहर करत आहेत. या धडाकेबाज क्रिकेटपटूने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या अप्रतिम कामगिरीने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची झोप उडवली आहे.
रोहित आणि विराट यांनी जगभरात धावा केल्या आहेत, मात्र 2023 च्या विश्वचषकापूर्वी हा फलंदाज आपल्या किलर बॅटिंगमुळे चर्चेत आला आहे.
या फलंदाजाने ताज्या ICC ODI रँकिंगमध्ये इतिहास रचला आहे. 2023 च्या विश्वचषक पात्रता फेरीतील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर, झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझाने आपली छाप सोडली आहे.
हा धाकड फलंदाज सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे
झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझाने ताज्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत बरीच प्रगती केली आहे. 2023 विश्वचषक पात्रता फेरीतील तीन दमदार डावांच्या आधारे, सिकंदर रझाने एकदिवसीय फलंदाजांच्या ताज्या ICC क्रमवारीत सात अंकानी झेप घेत 27 व्या स्थानावर पोहोचला आहे.
सिकंदर रझा व्यतिरिक्त, वेस्ट इंडिजचा (West Indies) विस्फोटक यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरन याने देखील एकदिवसीय क्रमवारीत बरीच प्रगती केली आहे.
इतिहास घडवला
दरम्यान, 37 वर्षीय सिकंदर रझाने नेदरलँडविरुद्ध नाबाद 102 धावांची सुरुवात केली आणि त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध 68 आणि अमेरिकेविरुद्ध 48 धावा केल्या. विशेष म्हणजे, सिकंदर 8 विकेट्ससह क्वालिफायरमधील अव्वल 6 विकेट घेणार्यांपैकी एक आहे.
बॅट आणि बॉल या दोन्हीसह त्याच्या उत्कृष्ट फॉर्ममुळे, रझाने एकदिवसीय अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दोन स्थानांची प्रगती केली आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन आणि अफगाणिस्तानचा (Afghanistan) मोहम्मद नबी अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.
वनडे फलंदाजी क्रमवारीत 13 अंकानी झेप घेतली आहे
दुसरीकडे, क्वालिफायरमध्ये वेस्ट इंडिजसाठी दोन शतके झळकावल्यानंतर पूरनने या क्रमवारीत 13 अंकाची झेप घेतली असून तो 19 व्या स्थानावर पोहोचला आहे.
पूरनने नेपाळविरुद्ध 115 आणि नेदरलँडविरुद्ध नाबाद 104 धावांसह 296 धावांसह ग्रुप स्टेजमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता, पण सुपर ओव्हरच्या पराभवात त्याचे शतक व्यर्थ गेले. पूरनने ग्रुप स्टेजमध्ये सर्वाधिक 15 षटकारही मारले आहेत.
आता या वर्षाच्या शेवटी भारतात होणाऱ्या ICC 2023 विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळवण्याच्या वेस्ट इंडिजच्या आशांमध्ये तो महत्त्वाचा घटक बनला आहे.
गोलंदाजी क्रमवारी
त्याचबरोबर, तीन डावातील तीन अर्धशतकांमुळे नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत 24 अंकाची झेप घेत 40 व्या स्थानावर पोहोचला आहे, तर स्पर्धेतील सध्याचा सर्वाधिक धावा करणारा, शॉन विल्यम्स 10 अंकाची झेप घेत 43 व्या स्थानावर पोहोचला आहे.
क्वालिफायरच्या ग्रुप स्टेजमध्ये चार मॅचमध्ये 18 विकेट्स घेऊन आघाडीवर असलेला श्रीलंकेचा लेग-स्पिनर वानिंदू हसरंगा एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत 24 व्या स्थानी पोहोचला आहे.
जोश हेझलवूडने अव्वल स्थान कायम राखले आहे
झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज रिचर्ड नगारावा, ज्याने आतापर्यंत 10 विकेट्स घेऊन स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने वनडे गोलंदाजी क्रमवारीत 27 अंकाची झेप घेतली असून तो 32 व्या स्थानावर पोहोचला आहे.
एकदिवसीय फलंदाजी किंवा गोलंदाजी क्रमवारीतील अव्वल 10 मध्ये कोणताही बदल झालेला नाही, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड यांनी आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.