T20 WC Dainik Gomantak
क्रीडा

T20 WC: पाऊस जिंकला संघ हारले! आजचे दोन्ही सामने एकही चेंडू न टाकता रद्द

पावसामुळे आजचे दोन्ही सामने एकही चेंडू न टाकता अखेर रद्द करण्यात आले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

T20 विश्वचषकात आज (शुक्रवारी) दोन्ही सामने पावसामुळे रद्द करण्यात आले. आज ग्रुप एक मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (England And Australia) यांच्यात तसेच, आफगाणिस्तान आणि आर्यलंड (Afghanistan And Ireland) यांच्यात लढत होणार होती. पण, पावसामुळे आजचे दोन्ही सामने एकही चेंडू न टाकता अखेर रद्द करण्यात आले आहेत. यापूर्वी देखील आफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

एमसीजी मैदानावर (Melbourne Cricket Ground, Melbourne) सकाळी आफगाणिस्तान आणि आर्यलंड यांच्यात सामना होणार होता. मात्र खराब वातावरणामुळए सामना पुढे ढकलण्यात आला. पावसाचा जोर काही केल्या कमी न झाल्यामुळे अखेर उभय संघातील सामना रद्द करण्यात आला. सामन्यासाठी नाणेफेक देखील झाली नाही. तसेच, दुपारी याच मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या होणारी लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. पावस थांबण्याची वाट वाहणाऱ्या सर्व संघाना अखेर पाऊस जिंकला असे म्हणायची वेळ आली आहे.

दरम्यान, ग्रुप एक मधील हे दोन्ही सामने रद्द झाल्याने येत्या काळात विश्वचषक स्पर्धेतील चुरस आणखी कठिण होणार आहे. सध्या ग्रुप एकमध्ये न्यूझीलंड तीन गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर, दोन गुणांसह आफगाणिस्तान दोन गुणांसह शेवटी आहे. तसेच, ग्रुप दोन मध्ये भारत चार गुणांसह अग्रस्थानी आहे. तर, नेदरलँड आणि पाकिस्तान शुन्य गुणांसह शेवटी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: कासवाडा- तळावली येथे घरावर कोसळले वडाचे झाड

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT