Virat Kohli in SENA Countries: जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. एका बाबतीत विराटने महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकले. नेदरलँड्सविरुद्धच्या T20 विश्वचषक सामन्यात त्याने अर्धशतक झळकावताना हा पराक्रम केला. भारताने सिडनीमध्ये खेळलेला हा सामना 56 धावांनी जिंकून गटात अव्वल स्थान गाठले.
SENA देशांमध्ये सर्वाधिक अर्धशतक
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) गुरुवारी नेदरलँड्सविरुद्ध 44 चेंडूत 62 धावांची नाबाद खेळी खेळली. यादरम्यान, त्याने (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकण्याच्या बाबतीत महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) मागे टाकले. या चार देशांमध्ये विराटचे हे एकूण 49 वे अर्धशतक होते. त्याच्या नावावर आता ऑस्ट्रेलियात 17 अर्धशतके, इंग्लंडमध्ये 18, न्यूझीलंडमध्ये पाच आणि दक्षिण आफ्रिकेत 9 अर्धशतके आहेत. तर दुसरीकडे, सचिनने ऑस्ट्रेलियात 17 अर्धशतके, इंग्लंडमध्ये 12, न्यूझीलंडमध्ये (New Zealand) 10 आणि दक्षिण आफ्रिकेत 9 अर्धशतके झळकावली.
ऑस्ट्रेलियात दोघांची उत्कृष्ट कामगिरी
क्रिकेटच्या दृष्टिकोनातून, प्रत्येकाच्या कारकिर्दीत SENA देशांमध्ये चांगली कामगिरी करणे महत्त्वाचे आहे. या देशांच्या खेळपट्ट्या वेगवान विकेटसाठी ओळखल्या जातात. ऐतिहासिकदृष्ट्या, या देशांमध्ये भारताची कामगिरी इतर देशांच्या तुलनेत कमकुवत राहिली आहे, परंतु विराट आणि सचिनने त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केली आहे.
नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवला
33 वर्षीय विराट कोहलीने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (SCG) दमदार कामगिरी करत नेदरलँड्सविरुद्धच्या T20 विश्वचषक सामन्यात नाबाद 62 धावा केल्या. विराटने 44 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले. विराटशिवाय कर्णधार रोहित शर्माने 53 आणि सूर्यकुमार यादवने नाबाद 51 धावांचे योगदान दिले. भारताने 2 गड्यांच्या मोबदल्यात 179 धावा केल्या, त्यानंतर नेदरलँडचा संघ 9 विकेटवर 123 धावाच करु शकला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.